धाराशिवमध्ये गणेश मूर्ती विक्रीतून जमलेल्या एका लाखावर चोरट्यांचा डल्ला 

 
crime

धाराशिव : फिर्यादी नामे- प्रशांत माणिक कुंभार, वय 36 वर्षे, रा.चोराखळी, ता. कळंब जि. धाराशिव यांचे धाराशिव शहरातील सदाशिव हार्डवेअर तुळजाभवानी शॉपिंग शेंटर समोर गणपती मुर्त्यांचा स्टॉल मध्ये गणपती मुर्तीची विक्री करुन जमलेले एकुण 1,00,000₹ हे बॅगमध्ये ठेवले होते. ते दि.19.09.2023 रोजी 17.00 ते 17.45 वा. सु. अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी प्रशांत कुंभार यांनी दि.20.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : फिर्यादी नामे- मिरा अनिकेत पाटील, वय 33 वर्षे, रा.शिवाजीनगर येडशी ता. जि. धाराशिव या दि.20.09.2023 रोजी 12.00 वा. सु. कळंब बसस्थानक येथे उभे असताना त्यांचे हातातील पर्स मधील 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 3,00,000₹ किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी मिरा पाटील यांनी दि.20.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.