उस्मानाबाद बस आगारातील व्यवस्थापकास वाहक, चालकाकडून मारहाण 

एसटी कर्मचाऱ्यांचा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहचला 

 

उस्मानाबाद : एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना, राज्य सरकारने पोलीस बंदोबस्तामध्ये काही बस सोडल्या आहेत. यावरून एसटीचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात वाद पेटला आहे. हा वाद आता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहचला आहे. 


राज्य परिवहन महामंडळच्या उस्मानाबाद बस आगावरातील व्यवस्थापक- पांडुरंग मच्छिंद्र पाटील हे दि. 27.11.2021 रोजी 12.00 वा. सु. कर्तव्यावर असतांना उस्मानाबाद- तुळजापूर प्लॅटफॉर्म वरील बस सोडत होते. यावेळी उस्मानाबाद आगारातील वाहक- दत्ता सुखदेव माने, शंकर रामराव पडवळ व चालक- गणेश भगवान मंडोळे यांनी तेथे आंदोलकरण्यासाठी हजर राहून पांडुरंग पाटील यांना शिवीगाळ करुन मारहान करुन ठार मारण्याची धमकी देउन पाटील यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन पांडुरंग पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
महसूल कर्मचाऱ्यास मारहाण 

भुम  : बाणगंगा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन महसूल विभागाचे पथक दि. 16.11.2021 रोजी 05.00 वा. सु. वारदवाडी येथे गस्तीस होते. यावेळी आष्टा, ता. भुम ग्रामस्थ- शिवाजी सर्जेराव घाडगे हे एका ट्रॅक्टर- ट्रेलरमधून अवैधरित्या वाळु (गौण खनिज) वाहून नेत असतांना आढळले. यावर पथकाने घाडगे यांना ट्रॅक्टर- ट्रेलरसह आपल्या सोबत घेण्यास सांगीतले असता घाडगे यांनी तसे न करता ट्रेलरमधील वाळु खाली ओतून वाहनासह पसार होत असतांना पथकाने ट्रॅक्टर ओव्हरटेक करुन थांबवण्यास सांगीतले असता घाडगे यांनी ट्रॅक्टरने पथकाच्या वाहनास धक्का देउन निघून गेले. यात पथकातील मंडळ अधिकारी- श्री. शिवराज पाटील व लक्ष्मण कांबळे हे जखमी झाले. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन शिवराज पाटील यांनी दि. 27 नोव्हेंबर रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 279, 337 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीच्या दोन घटना 

नळदुर्ग  : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील शहनाज जमान सय्यद यांसह त्यांच्या कुटूंबातील 6 सदस्य यांचा ग्रामस्थ- खमरुन रहिम सय्यद यांसह त्यांच्या कुटूंबातील 7 सदस्यांशी भुखंड मालकीच्या कारणावरुन जुना वाद आहे. यातून दि. 26.11.2021 रोजी 19.30 वा. सु. राहत्या गल्लीत या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी गटातील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शहनाज सय्यद व खमरुन सय्यद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

कळंब : सावरगाव (पु.), ता. कळंब येथील अशोक वाघमारे, सुरज वाघमारे यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 22.11.2021 रोजी 11.30 वा. सु. गावतील हनुमान मंदिरामागे ग्रामस्थ- परमेश्वर बळीराम चन्ने यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करुन काठीने हातापायावर, डोक्यात मारहान करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या परमेश्वर चन्ने यांनी दि. 27 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.