तुळजापूर तालुक्यात मोटारसायकल अपघातात एक ठार 

 

तुळजापूर- आनंद विठ्ठल पाटील रा. बरमगाव ता.जि. उस्मानाबाद सोबत नागनाथ दत्तु मुर्टे, वय 44 वर्षे रा. जवळगा मेसाई जि. उस्मानाबाद हे दोघे दि.28.05.2023 रोजी 20.30 वा. सु. सलगरा ते जवळगा मेसाई माध्यामिक विद्यालय जवळ रोडवरुन शेतात मोटरसायकल क्र एमएच 25 ए.वाय. 1870 वरुन जात होते. दरम्यान आनंद पाटील यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवल्याने नागनाथ मुर्टे  हे मोटरसायकल वरुन खाली पाडून गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- अक्षय नागानाथ मुर्टे यांनी दि.30.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

निष्काळजीपने वाहने चालवणाऱ्यावर गुन्हे नोंद

धाराशिव  : अरोपी नामे- 1) वैभव कल्याण इंगळे, वय 30 वर्षे, रा. येडशी ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.30.07.2023 रोजी 00.30 वा. सु. योडशी येथे येडशी ते लातुर रोडवर हॉटेल कालिका समोर आपल्या ताब्यातील पिकअप क्र. एम.एच. 25  ए.एस 2473 हा  रोडवर भरधाव वेगात निष्काळजीपने चालवत असताना उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्ती विरुध्द भा.दं.वि.सं. कलम- 279 अन्वये उस्मानाबाद ग्रामीण  पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 वाशी  : आरोपी नामे-1)बळीराम रामलिंग सोन्नर, वय 40 वर्षे, रा. यशवंडी ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी दि.30.07.2023 रोजी 13.45 वा.सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आपल्या ताब्यातील पिकअप क्र एमएच 25 ए.एस. 2473 हा रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.द.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो. ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : आरोपी नामे-1)गणेश हणुमंत खुणे, वय 30 वर्षे, रा. अकुलगांव ता. माढा जि.सोलापूर यांनी दि.30.07.2023 रोजी 18.45 वा.सु. आमृतुल्य हॉटेल समोर परंडा बार्शी रोड परंडा येथे आपल्या ताब्यातील वाहन क्र एमएच 45 ए.एफ 5861 हा रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.द.वि.सं. कलम-283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो. ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.