नळदुर्गजवळ कारच्या धडकेत एक ठार 

 

नळदुर्ग  :मयत नामे- हरी धनु राठोड, वय 59 वर्षे रा. एकंबी तांडा ता. औसा जि. लातुर, हा. मु. साखर कारखाना नळदुर्ग ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि.13.08.2023 रोजी 15.00 वा. सु. एकंबी तांडा ते साखर कारखाना नळदुर्ग कडे मोटरसायकल क्र एमएच 24 आर 5575 वरुन चिवरी पाटीचे पुढे वळणावरुन जात होते. दरम्यान कार क्र टी. एस. 08 एच जी 5288 चा चालक नामे रवितेजा प्रसाद घुमडे रा. हैद्राबाद यांनी  त्यांचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून हरी राठोड यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या आपघातात  हरी राठोड हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- राजेंद्र मेघु पवार रा. आनंदनगर नळदुर्ग यांनी दि.15.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.     

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 मुरुम  : आरोपी नामे-1) राजकुमार जिवल राठोड, वय 48 वर्षे, रा. नाईकनगर, मुरुम ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि. 15.08.2023 रोजी 19.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एन 636 हा हा बसस्थानक रोडवर मुरुम येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभा केले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर गुन्हा नोंद

नळदुर्ग :आरोपी नामे-1) प्रेम महेश काळे, 2) अक्षय राजू इगवे, 3) सुरज लक्ष्मण शिंदे, 4) अझर शेख, 5)अशपाक शेख, 6) शाहीद बागवान सर्व रा. इंदीरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि.14.08.2023 रोजी 22.59 वा. सु. बालालघाट कॉलेजच्या पाठीमागे इंदीरानगर नळदुर्ग येथे मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे जमाव बंदी आदेशाचे उल्लघंन करुन एकत्रीत येवून किरकोळ कारणावरुन मोठमोठ्याने आरडाओरडा करुन शिवीगाळ करुन आपआपसात झोंबाझोंबी करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन सार्वजनिक शांततेचा भंग करताना नळदुर्ग पोलींसाना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 160 सह 37(1)(3) मपोका अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.