तुळजापूरजवळ अपघातात एक ठार 

 

तुळजापूर  : जिजामाता नगर, तुळजापूर येथील- नितीन दत्तु लोंढे, वय 38 वर्षे, हे दि. 11.02.2023 रोजी 13.00 वा. सु. अजिंक्य रेसीडेन्सी कॉलनी नळदुर्ग रोड तुळजापूर रस्त्यावरुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे निष्काळजीपने चालवल्याने नितीन यांना पाठीमागून धडक दिली. यात नितीन हे गंभीर जखमी होउन  मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहन चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- शशिकांत दत्तु लोंढे यांनी दि. 12.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 नळदुर्ग  :कुरेशी गल्ली, नळदुर्ग येथील- अन्वर मंजुर कुरेशी यांनी  दि. 12.02.2023 रोजी 23.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र. एम.एच. 09 ए.बी. 9424 हा नळदुर्ग येथे बसस्थानक समोर एनएच 65 जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना आढळले.

भूम  : समर्थनगर, भुम येथील- राजेंद्र चंद्रकांत ढगे यांनी  दि. 12.02.2023 रोजी 17.30 वा. सु. आपल्या ताब्यातील पिकअप क्र. एम.एच. 25 ए.जे. 0907 हा भुम येथे तहसिल कार्यालया समोर जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना भुम पोलीसांना आढळले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत सबंधीत पो.ठा. येथे 2 गुन्हे नोंदवले आहेत.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 मुरुम  : नागोबा गल्ली, येणेगुर ग्रामस्थ- श्रीकांत शामराव मंगरुळे दि.12.02.2023 रोजी 20.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रं एमएच 25 एएच 0245 ही मुरुम मोड येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.