नळदुर्ग : रात्रगस्ती दरम्यान संशयित इसम ताब्यात

 

नळदुर्ग  : नळदुर्ग पो.ठा. चे पथक दि. 21.02.2023 रोजी 03.30 वा.सु. नळदुर्ग शहरात रात्रगस्तीस असताना दरम्यान शहरातील एनएच 65 नळदुर्ग रोडवर हॉटेल सितारामचे पाठीमागे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. 

यावर त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- शशिकांत नागनाथ सुरवसे , रा. त्रिकोळी ता. उमरगा असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो मालाविरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

कळंब  : आर्थीक व्यवाहाराच्या कारणवरून, दत्तनगर, कळंब येथील- शामकुमार भाउराव काळे  यांना दि.20.02.2023 रोजी 10.00 ते 12.00 वा. सु.कळंब येथे व बिड रोड केज येथे कळंब येथील- दादा मुंढे, सचिन सलगर, विकास जावळे, विजय जावळे, यांनी शामकुमार यांना जबरदस्तीने गाडीत बसवून तुझे राहते घर आमचे नावावर करुन दे अशी धमकी देवून वेळोवेळी मानसिक त्रास दिल्याने. शामकुमार यांनी नमुद लोकांच्या जाचास त्रासास कंटाळुन स्वत:चे अंगावर पेट्रोल ओतुन आग लावून घेतली. अशा मजकुराच्या शामकुमार काळे यांनी दि.21.02.2023 रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 365,504,506, 34, सह म.सा.कायदा कलम 39,45 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.