नळदुर्ग  :  शेतीसाठी कर्ज काढून बँकेची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल 

 

नळदुर्ग  : चव्हाणवाडी, ता. तुळजापूर येथील- उमाकांत सदाशिव खलाटे यांनी  सुमित्रा मल्टीस्टेट को- ऑप क्रेडीट सोसायटी लि. सोलापूर शाखा काटगांव येथील शेती सुधारणी करीता 2,50,000₹  शेत गट नं 83 मधील शेत तारण ठेवून गहाण खत करुन सदर सोसायटीस देवुन उचलले होते. सदर कर्जाचा भरणा न करता ते विक्री व हस्तांतरण करणेबाबत सदर सोसायटीस कोणतीही माहिती ने देता शेती विक्री करुन सुमित्रा मल्टीस्टेट को- ऑप क्रे.डीट सोसायटी लि. सोलापूर शाखा काटगांव यांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या आनंद बंडोपंत बडवे यांनी दि. 20.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पत्र्याच्या शेडला आग लावून  नुकसान 

बेंबळी  : पाडोळी, ता. उस्मानाबाद येथील-अमोल गुंड, पवन पवार, ज्ञानेश्वर बनसोडे, प्रवीण कांबळे, यांनी कोठा काडुन घेण्याचे कारणावरुन दि. 19.05.2023 रोजी 04.00 वा. सु. पाडोळी शिवारातील दामु संभाजी गुंड यांचे गायरानातील जनावरांचे कोठा पत्र्याच्या  शेडला आग लावून दिली. या मध्ये गुंड  यांचे संसार उपयोगी, शेतीचे साहीत्य, दोन शेळ्या व एक म्हशीचे वासरु जाळून नुकसान केले. शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दामु गुंड यांनी दि. 20.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 436, 429, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.