मुरूम : अवैध गुटखा वाहतुक गुन्हा दाखल

मुरुम  : बेळंब येथील मुरुम रस्त्यावर दि. 07.11.2021 रोजी 06.30 वा. मुरुम पोलीस गस्त करत होते. यावेळी बेळंब ग्रामस्थ- निखील धुळाप्पा तुगावे हे बजाज बॉक्सर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 9230 वरुन महाराष्ट्र शासनाद्वारे प्रतिबंधीत केलेला गुटखा व पानमसाला असा 60,000 ₹ किंमतीचा अन्नपदार्थ वाहून नेत असतांना आढळले. यावरुन मुरुम पो.ठा. च्या पोलीस अंमलदार- ज्योती पंढरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

येरमाळा  : हिरीयुर, जि. चेत्रदुर्गा येथून निघालेला मालवाहू मिनी ट्रक क्र. आर.जे. 11 जीबी 7812 हा दि. 07.11.2021 रोजी 03.00 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर तेरखेडा पारधी पिढी परिसरात आला असता मिनीट्रकची गती कमी झाल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने पाठीमागील बाजूने वाहनावर चढून हौद्यावरील टारपोलीन फाडून हौद्यातील एकुण 45,500 ₹ किंमतीचे 14 नारीयल पावडरची पोती धावत्या ट्रक मधून चोरुन नेली. अशा मजकुराच्या मिनीट्रक चालक- हरपालसिंग सैतानसिंग चौधरी, रा. नासिरपुर, जि. हाथरस, राज्य- उत्तरप्रदेश यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.