मुरूम : सुनेचा छळ करणाऱ्या आरोपींना कारावासासह आर्थिक दंड

 

मुरुम: सुनेचा छळ केल्याप्रकरणी मुरुम पो.ठा. येथे गु.र.क्र. 107 / 2014 हा भा.दं.सं. कलम- 498 (अ), 324, 504, 34 दाखल होता. सदर गुन्ह्याचा निकाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उमरगा येथे आज दि. 09 सप्टेंबर रोजी जाहिर होउन गुन्ह्यातील 5 आरोपींना 1 वर्षे साधा कारावास आणि प्रत्येकी 2,200 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 
बेदरकारपने वाहन चालवून अपघात करणाऱ्यास 1,000 ₹ दंड

बेंबळी  : चालक- ईरफान अहेमद खान हकीमोद्दीन, रा. भरसांडा, जि. प्रतापगड, राज्य- उत्तरप्रदेश यांनी दि. 08 सप्टेंबर रोजी 08.00 वा. सु. भंडारी शिवारातील महामार्ग क्र. 361 वर ट्रक क्र. यु.पी. 70 जीटी 3990 हा निष्काळजीपने, बेदरकारपने चालवल्याने रस्त्याबाजूस पलटला. यावरुन बेंबळी पो.ठा. येथे गु.र.क्र. 148 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 279, 336 हा दाखल होता.

            सदर गुन्ह्याचे दोषारोपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद येथे दाखल करण्यात येउन या खटल्याचा निकाल आज दि. 09 सप्टेंबर रोजी जाहिर होउन ईरफान हकीमोद्दीन यांना भा.दं.सं. कलम- 279 च्या उल्लंघनाबद्दल 750 ₹ दंड व भा.दं.सं. कलम- 336 च्या उल्लंघनाबद्दल 250 ₹ दंड व दंड न भरल्यास 1 दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपने वाहन चालवणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

तुळजापूर  : 1) लक्ष्मण मस्के, रा. तुळजापूर 2) समाधान सुतार, रा. करजखेडा हे दोघे दि. 08 सप्टेंबर रोजी 12.30 व 16.00 वा. सु. नविन बसस्थानक, तुळजापूर येथील रस्त्यावर आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे मॅजीक वाहने निष्काळजीपने, बेदरकारपने चालवत असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.