शिराढोणमध्ये विद्यार्थीनीला पळवून विनयभंग 

 

शिराढोण  : एक 17 वर्षीय तरुणी (नाव- गाव गोपनीय) दि. 03 सप्टेंबर रोजी 10.00 वा. शैक्षणीक कामानिमीत्त पायी जात असतांना तीच्या गावातीलच तीन तरुण दोन मोटारसायकलवर तेथे आले. त्यातील एकट्या तरुणाने तीचा हात पकडून तीला आपल्या मोटारसायकलवर बसण्यास सांगीतले. तर दुसऱ्या मो.सा. वरील दोघांनीही तीला त्या तरुणाच्या मो.सा. वर बसण्यास भाग पाडले. यानंतर त्यांनी त्या तरुणीस दुसऱ्या गावाच्या रस्त्यावर नेउन सोडून देउन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 363, 506, 34 सह पोक्सो कायदा कलम- 8 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे दोन गुन्हे 

नळदुर्ग  : नागझरी तांडा येथील श्रीराम धनसिंग पवार यांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 30.08.2021 रोजी 18.30 वा. सु. तांड्यावरील धनाजी ठाकुर पवार यांना गंधोरा शिवारातील तांबोळी ढाब्यासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या धनाजी पवार यांनी दि. 03 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : सिंदफळ येथील शिवाजी कापसे व सुनिल मिसाळ या दोन्ही कुटूंबात मोटारसायकल रस्त्यात लावण्यावरुन दि. 02 सप्टेंबर रोजी 21.30 वा. वाद झाला. यात दोन्ही कुटूंबीयांनी एकमेकांच्या कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शिवाजी कापसे व सुनिल मिसाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.