उस्मानाबादेत विवाहित महिलेचा विनयभंग 

 

उस्मानाबाद  : एक 25 वर्षी महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 08.11.2021 रोजी 21.30 वा. सु. शौचास गेली असता गावातीलच एका पुरुषाने तीचा पाठलाग करुन तीच्या सोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या महिलेने त्या पुरुषाच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली व घरी आल्यानंतर घडला प्रकार आपल्या कुटूंबीयांस सांगीतला. 

यावर तीच्या कुटूंबीयांनी त्या पुरुषास जाब विचारला असता त्या पुरुषासह त्याच्या कुटूंबीयांनी नमूद महिलेसह तीच्या कुटूंबीयांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. तसेच त्या महिलेच्या घरासमोरील दोन वाहनांवर काठ्या मारुन आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दि. 10.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 324, 323, 504, 143, 147, 149, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीच्या दोन घटना 

परंडा  : परंडा येथील मुराद पठाण, अरबाज पठाण, सलमान पठाण यांनी ग्रामस्थ- अझर मझहर जिनेरी यांना उसणे पैसे दिले होते. अझर जिनेरी हे दि. 09.11.2021 रोजी 19.30 वा. सु. परंडा येथील चौकात असतांना नमूद तीघांनी ते पैसे देत नसल्याच्या कारणावरुन अझर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटाने मारहान करुन त्यांना जखमी केले व पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अझर जिनेरी यांनी दि. 10.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी : पारेवाडी, ता. परंडा येथील हणुमंत बालगुडे, तुकाराम बालगुडे, गोपाळ बालगुडे, धनंजय बालगुडे या चौघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 27.10.2021 रोजी 10.30 वा. सु. ग्रामस्थ- अशोक भानुदास साळुंके यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, लोखंडी गज, दगडाने मारहान केल्याने अशोक यांच्या डोळ्याजवळ दगड लागून ते गंभीर जखमी झाले. यावेळी अशोक यांच्या बचावाचा प्रयत्न त्यांच्या पत्नी- उमा यांनी केला असता त्यांच्या कानाजवळ लोखंडी गज लागून त्याही जखमी झाल्या. अशा मजकुराच्या अशोक साळुंके यांनी दि. 10.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.