भूम : महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गैरव्यवहार 

 

भूम   : पाथरुड, ता. भुम येथील- भागवत गावडे, राजश्री गावडे, बादल गावडे, क्रांतीसिंह गावडे, संग्राम गावडे,बॅक मॅनेजर श्रीधर टाकळकर या सर्वांनी  संगणमताने दि.17.09.2002 महाराष्ट्र ग्रामीण बॅक येथे बनावट दस्तएैवज तयार करुन ते खरे आहे असे भासवून बॅकेत सादर करुन त्याव्दारे बॅकेकडून ब्रम्हदेव वासुदेव गावडे यांच्या आईचे खोटे अंगठे मारुन दि.09.02.2011 रोजी 1,31,500 रक्कम उचलून ब्रम्हदेव यांची फसवणूक केली. तसेच ब्रम्हदेव व त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ब्रम्हदेव गावडे यांनी दि.16.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 409, 420, 465, 467, 468, 471,506,120 (ब) ,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा तालुक्यात हाणामारी 

परंडा  : आरणगाव, ता. परंडा येथील - रामहारी पिंगळे, सुशील पिंगळे, समाधान पिंगळे यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 11.12.2022 रोजी 10.00 वा. सु. अंदोरी शिवारातील शेत गट नं 7 ब आर मधील संगणमताने अंदोरी, ता. परंडा येथील- ईश्वर श्रीमंत उमाप यांच्या शेतातील उस पिक रामहारी, सुशील, समाधान तोडून घेवून जात असताना ईश्वर यांनी त्यास हाटकले असता. नमुद तिघांनी ईश्वर यांना शिवीगाळ करुन मारहान केली. व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ईश्वर उमाप यांनी दि. 16.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 382, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.