कळंब : चोरीच्या तीन गुन्ह्यांतील मालासह दोघे अटकेत

 

कळंब  : भगवान गदळे, रा. केज यांचा स्मार्टफोन काल दि. 25.10.2021 रोजी 15.00 वा. कळंब येथील साप्ताहीक बाजारातून अज्ञाताने चोरला होता. या प्रकरणी त्यांनी कळंब पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 नुसार 360 /2021 हा गुन्हा नोंदवला. या  गुन्ह्याची उकल करतांना कळंब पो.ठा. च्या पोनि- . यशवंत कदम यांच्या पथकातील पोहेकॉ- सुनिल कोळेकर, पोना- हंगे, दळवी, मुंडे पोकॉ- पतंगे, शेख, मुळे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आज दि. 26.10.2021 रोजी दिपक विलास पवार, रा. कळंब यासह त्याचा जोडीदार कृष्णा वैजनाथ कदम, रा. बीड जिल्हा यांना कळंब येथून ताब्यात घेतले.

 यावेळी वर नमूद चोरीचा स्मार्टफोन त्यांच्या ताब्यात आढळल्याने पोलीसांनी अधिक विचारपूस केली असता घरगुती वापराच्या तीन एलपीजी टाक्या, स्वयंपाकाची स्टील भांडी असे साहित्य आढळले. या तीन टाक्यां विषयी मालकी- ताबा या बाबत ते पोलीसांना समाधानकारक माहिती देउ शकले नाहीत.  यावरुन पथकाने अभिलेखावरील गुन्हे पडताळले असता नमूद तीन टाक्यांसह स्वयंपाकाची भांडी चोरीस गेल्यावरुन कळंब पो.ठा. येथील अनुक्रमे गु.र.क्र. 6 व 169, / 2021 दाखल असल्याचे समजले. यावर पथकाने नमूद सर्व मालासहीत त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारे कळंब पोलीसांच्या कौशल्याने स्मार्टफोन चोरीच्या गुन्ह्यासह चोरी, घरफोडीच्या अन्य दोन गुन्ह्यांची उकल झाली.