कळंब - उस्मानाबाद : वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन लॉजवर छापा 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कुंटणखाना चालवून वेश्या व्यवसाय  करणाऱ्या (अनैतिक देह व्यापार ) दोन लॉजवर कळंब आणि उस्मानाबाद पोलिसांनी छापा मारून , जवळपास नऊ  लोकांना अटक केली आहे. 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन एम.रमेश,सहा. पोलीस अधीक्षक उप विभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविद्रं गायकवाड पोलीस ठाणे कळंब, पोलीस उप निरीक्षक श्रीमती  वर्षा साबळे, पोहेकॉ/गलांडे,चव्हाण, अंभोरे, मोहिते,राउत, खांडेकर,गरड, सोनटक्के, मपोअं/ गिते,पत्तेवार व इतर मिळालेल्या गोपणीय माहिती कळंब शहरातील शिवप्रसाद लॉजमध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या कुटंनखाना चालू असल्याचे माहिती मिळाल्याने दोन डमी ग्राहक यांना सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता सदर ठिकाणी कुटंनखाना चालू असल्याचे दिसून आले. 

 सदर ठिकाणी दि.13.02.2023 रोजी 19.44 वा.सु. छापा मारला असता सदर ठिकाणी कुटंनखाना चालविणारा इसम नामे गोविंद श्रीमंतअप्पा लोखंडे,बाबु श्रीमंतअप्पा लोखंडे, ग्राहक इसम बिलाल शेख नुर बागवान वय 30 वर्षे  रा. मोमीन गल्ली कळंब व ज्ञानेश्वर भाउराव होनमाने रा.नागरझरवाडी, संतोष प्रकास लिके, वय 35 वर्षे रा खरडा, विजय सुभाष इगंळे वय 32 वर्षे रा वाकुद, ता.जामनेर, असे एकुण 6 जण पिडीत मिळून आले.सदर ठिकाणाहुन दोन पिडित महिलेची सुटका करण्यात आली. सदर व्यक्तींविरुध्द पोलीस ठाणे कळंब भा.दं.सं. कलम- 370, 370 अ (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अंतर्गत पोलीस ठाण्यात आज दि. 14.02.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या ठिकाणी दि 14.02.2023 रोजी मिळालेल्या  गोपणीय माहिती पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण हद्दीमध्ये मयुरेश हॉटेल लॉज ॲन्ड बार याच्या जवळ वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्याने एक डमी ग्राहक यांना सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री  झाल्याने दि.14.02.2023 रोजी सकाळी 04.39 वा. सु. छापा मारला असता पिडित महिला मिळून आली तिच्या सांगण्यावरून रंजित रघुनाथ भोसले, व गौरी लोकनाट्या कला केद्रं वडगाव येथील पार्टी मालकीन  हिने येडशी उड्डानपुलाजवळ उस्मानाबाद ते बीड जाणारे रोडलगत  मयुरेश हॉटेल लॉज ॲन्ड बार मालक नानासाहेब तानाजी पवार वय 40 वर्षेरा. येडशी उस्मानाबाद  लॉजचालक रंजित रघुनाथ भोसले वय 36 वर्षे रा.येडशी ता.उस्मानाबाद, प्रदिप त्रिंबक मुंढे,वय 33 रा. वडगाव जहागिंर ता. कळंब, मनोजकाकडे,सेलु ता. परभणी, असे संगणमत करून स्वताचे आर्थिक फायद्याकरीता ग्राहकास त्यांच्या मागणी प्रमाणे समागमणासाठी वेश्याव्यवसायासाठी आपल्या लॉजमध्ये रुम उपलब्ध करुन देणे त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करुन त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले. महिलांची सुटका करुन लॉज चालक- मालक नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 370, 370 अ (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4 , 5 अंतर्गत उस्मानाबाद (ग्रा) पोलीस ठाण्यात आज दि. 14.02.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.