जागजीत वृद्ध इसमाची गळफास घेऊन आत्महत्या 

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 
 

ढोकी : जागजी, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- केरबा मारुती माने, वय 80 वर्षे यांनी दि. 10.01.2022 रोजी 13.00 रोजी आपल्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. गावकरी- वैभव रावसाहेब कांबळे व रावसाहेब सटवा कांबळे या दोघांनी जुन्या वादावरुन केरबा माने यांना शिवीगाळ, अपमानित करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केल्याने केरबा माने यांना अपमान सहन न झाल्याने आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या सोमनाथ हरीभाऊ माने यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे तीन गुन्हे दाखल 

उमरगा  : कदेर, ता. उमरगा येथील संगिता विलास येवते या दि. 10.01.2022 रोजी 17.30 वा. सु. गट क्र. 310 मधील आपल्या शेतात होत्या. यावेही त्यांच्या शेतातील ऊसाची मोळी शेजारील शेतकरी- सुरेखा प्रकाश येवते यांच्या शेतात टाकल्याच्या कारणावरुन सुरेखा यांसह राजु येवते, गोविंद येवते या तीघांनी संगिता यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच राजु येवते यांनी संगिता यांच्या दोन्ही हातांवर विळ्याने वार करुन त्यांना जखमी केले व संगिता यांसह त्यांच्या कुटूंबीयांस ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संगिता येवते यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : खामसवाडी, ता. कळंब येथील शेळके कुटूंबातील अशोक, वैभव, मिटु, मोनिका, लताबाई व अशोक यांची पत्नी या सर्वांनी घरासमोरील जागेत मुरुम टाकण्याच्या कारणावरुन दि. 09.01.2022 रोजी 22.00 वा. सु. ग्रामस्थ- रामराजे हरिश्चंद्र बंडगर यांसह त्यांची पत्नी- जयश्री यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रामराजे बंडगर यांनी दि. 10 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : पेठसांगवी, ता. उमरगा येथील सुधाकर वशिष्ट गायकवाड यांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 09.01.2022 रोजी 21.00 वा. सु. गावातील एका दुकानासमोर ग्रामस्थ- राम सुरवसे यांना शिवीगाळ करुन काचेची बाटली राम यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. यावेळी राम यांच्या बचावास सरसावलेला त्यांचा भाऊ- गणपती यांसही सुधाकर यांनी शिवीगाळ करुन मारहान केली. अशा मजकुराच्या राम सुरवसे यांनी दि. 10 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.