उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या घटना 

 

उमरगा  : आष्टा (जहागीर), ता. उमरगा येथील शिवाजी वामन पाटील यांसह निवृत्ती जाधव, गणेश गायकवाड यांचा शिवाजी यांचे भाऊ- बालाजी वामन पाटील यांसह त्यांचा मुलगा यांच्याशी शेत रस्त्याच्या, ऊसतोडणीच्या कारणावरुन दि. 08.11.2021 रोजी 17.00 वा. सु. आष्टा (जहागीर) शिवारात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिवाजी पाटील व बालाजी पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

ढोकी  : जागजी, ता. उस्मानाबाद येथील राजेश माने, किरण नन्नवरे या दोघांनी आपली मस्करी केल्याच्या कारणावरुन दि. 07.11.2021 रोजी 18.00 वा. सु. पवननगर, जागजी येथे ग्रामस्थ- अविनाश धनंजय माने यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच राजेश माने यांनी अविनाश यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन, लोखंडी गजाने मारहान करुन त्यांना जखमी केले. यावेळी अविनाश यांच्या बचावास आलेला त्यांचा मित्र- तानाजी बनसोडे यांसही नमूद दोघांनी शिवीगाळ करुन मारहान केली. अशा मजकुराच्या अविनाश माने यांनी दि. 08.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : हंगरगा (तुळ), ता. तुळजापूर येथील संभाजी पलंगे, स्वप्नील चौगुले, सागर परमार, राजु पवार, सुजित नरवडे, अनंत परमार, कुनाल सावंत, प्रमोद गवळी, आकाश कामटे यांनी पुर्वीच्या वादाचा राग मनात धरुन दि. 04.11.2021 रोजी 20.30 वा. सु. ग्रामस्थ- अमर प्रकाश नन्नवरे हे त्यांच्या शेतातील पत्रा शेडमध्ये असतांना नमूद लोकांनी अमर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व दगड फेकून मारले. अशा मजकुराच्या अमर नन्नवरे यांनी दि. 08.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 336, 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : विलासपुर (पांढरी), ता. लोहारा येथील तात्याराव सोपान जांभळे यांसह त्यांची मुले- अमेश व महेश यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 07.11.2021 रोजी 21.15 वा. सु. भाऊबंद- विठ्ठल बलभिम जांभळे यांसह त्यांचे चुलते- अशोक जांभळे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विठ्ठल जांभळे यांनी दि. 08.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.