तावशीगडमध्ये एकास कर्ज देतो म्हणून ३८ हजाराला फसवले 

 

लोहारा  : तावशीगड येथील शिवाजी गिरी यांच्या भ्रमणध्वनीवर दि. 01 सप्टेंबर रोजी कर्ज मंजुरी योजने संबंधी एक लघू संदेश आला. यावर त्या संदेशातील लिंकवर गीरी यांनी आपली व्यक्तीगत बँक माहीती भरली असता त्यांना एका अज्ञाताचा फोन आला. समोरील व्यक्तीने, “तुमचे कर्ज मंजुर झाले असून त्या पोटी 38,775 ₹ शुल्क सांगीतलेल्या बँक खात्यात भरावी लागेल.” असे सांगितले. यावर गिरी यांनी काही एक विचार न करता मित्राच्या युपीआय खात्यातून त्या समोरील व्यक्तीच्या खात्यात ती रक्कम भरली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीच्या दोन घटना 

भुम  : अरुण मुरलीधर गवळी, रा. शेंडगे गल्ली, भुम यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञाताने दि. 02 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारा तोडून घरातील 9.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, पितळेची भांडी व 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : बाळु सोपान हिप्परकर, रा. टोनवाडी, ता. बार्शी यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीटी 7592 ही दि. 31.08.2021 रोजी 10.30 ते 11.00 वा. दरम्यान शासकीय जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद च्या आवारात लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली आहे. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.