उस्मानाबादेत सुर्यवंशी यांना दोन भामट्यानी घातला ४० हजाराला गंडा 

 

उस्मानाबाद  : देवळाली, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- नामदेव महादेव सुर्यवंशी हे दि. 29.11.2021 रोजी 11.30 वा. सु. एसबीआय बँक शाखा, उस्मानाबाद येथून 40,000 ₹ रक्कम काढून बस स्थानकासमोरील रस्त्याने जात होते. यावेळी दोन अनोळखी पुरुषांनी सुर्यवंशी यांना हटकुन, “हम हरीद्वारसे आये है, तुम हमे पैसे मत देना, सिर्फ अगरबत्ती का पुडा दे दो.” असे सांगीतले. यावर सुर्यवंशी यांनी त्यांना अगरबत्तीचा पुडा विकत आणुन दिला असता त्या दोघांनी सुर्यवंशी यांना बोलण्यात गुंतवून त्यांची हॅन्डबॅग आपल्याकडे घेतली व, “तुम बीस कदम जाके वापस आवो.” असे सुर्यवंशी यांना सांगीतले. यावर सुर्यवंशी यांनी तसे करताच ते दोघे भामटे 40,000 ₹ असेलली ती पिशवी घेउन पसार झाले. अशा मजकुराच्या नामदेव सुर्यवंशी यांनी दि. 01.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 महिलेचा लैंगिक छळ

 परंडा तालुक्यातील एक 30 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 01.12.2021 रोजी दुपारी 12.00 वा. सु. घरी एकटी असल्याची संधी साधून तीच्या मामे दिराने ठार मारण्याची धमकी तीला देउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत महिलेच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवलाआहे.

मारहाणीच्या दोन घटना 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील पृथ्वीराज भाऊराज मस्के व यशराज हे दोघे भाऊ परिक्षा अर्ज भरण्यासाठी दि. 30.11.2021 रोजी 12.30 वा. सु. भोसले हायस्कुल, उस्मानाबाद येथे मोटारसायकलने गेले असता मो.सा. लावण्याच्या कारणावरुन शाळेतील शिक्षक पवार, डोलारे, कापसे यांसह अन्य व्यक्तींनी मस्के बंधूंना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या पृथ्वीराज मस्के यांनी दि. 01.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 504, 34 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा  : तुरोरी, ता. उमरगा येथील आश्वीन मल्लीकार्जुन कस्तुरे व सोमनाथ या दोघा भावांत दि. 01.12.2021 रोजी 11.00 वा. सु. घरासमोरील अंगणात भांडणे चालू होते. यावेळी त्यांचा मोठा भाऊ- विकास व वडील मल्लीकार्जुन यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आश्वीन व सोमनाथ यांनी वडील- मल्लीकार्जुन व भाऊ- विकास यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विकास कस्तुरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.