होर्टी  : सोलार एनर्जी कंपनीमध्ये घुसून सीसीटीव्ही कॅमेराचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल 

 

नळदुर्ग  : घनसोली, मुबंई येथील- शरद बबन काशीद हे दि.16.02.2023 रोजी 11.30 वा.सु. सोलार एनर्जी कंपनी होर्टी येथे असताना हालदरा तांडा, होर्टी, ता. तुळजापूर येथील- तुकाराम पवार, शालुबाई राठोड, लिबांजी राठोड, सुरेश चव्हाण, मिराबाई चव्हाण, कविता चव्हाण यांनी जमीनीच्या वादावरुन संगणमताने शरद यांना व कंपनी मधील कामगारांना शिवीगाळ करुन तुम्ही उस्मानाबाद सोलार कंपनी कशी चालवता असे म्हणून कंपनीमध्ये घुसून सीसीटीव्ही कॅमेराचे व हार्ड डिस्क चे वायर तोडून नुकसान केले. तसेच सोलार कंपनीचे प्लॅन्ट बंद करुन कंपनीचे 6,00,000 ₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या शरद काशीद यांनी दि. 17.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 452, 504, 506, 143, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई 

ढोकी : वरुडा, ता. उस्मानाबाद येथील- अविनाश गंगावणे हे दि.16.02.2023 रोजी 15.00 वा. सु. हिंगळजवाडी ते उस्मानाबाद जाणारे रोडलगत हॉटेल जिव्हाळा येथे अंदाजे 2,100 ₹ किंमतीची  देशी विदेशी दारुच्या 30 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर भंडारवाडी, ता. उस्मानाबाद येथील- वैशाली पवार ह्या 16.02 वा. सु. भंडारवाडी येथे ईर्ला गावाकडे जाणारे रोडलगत अंदाजे 5,020 ₹ किंमतीची  देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या व 65 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या, तर आरणी, ता. उस्मानाबाद येथील- संतोष गरड  हे 19.15 वा. सु. हॉटेल शेतकरी ढाब्यामध्ये भंडारवाडी येथे अंदाजे 2,470 ₹ किंमतीची  देशी विदेशी दारुच्या 29 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

लोहारा  : उदतपूर, ता. लोहारा येथील- बिभीषण याशवंत दलाल हे दि.17.02.2023 रोजी 15.30 वा. सु. उदतपूर येथे सास्तुर जाणारे रोडलगत अंदाजे 880 ₹ किंमतीची  देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंतर्गत संबधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.