मुलीसोबत चुंबन घेत असल्याचा फोटो व्हाट्स ॲप स्टेटसला ठेवला 

उस्मानाबादेत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 
 

उस्मानाबाद  : एका तरुणाने गावातीच एका 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) चुंबन घेत असल्याचे आपले छायाचित्र दि. 08 ऑक्टोबर रोजी व्हाट्सॲप स्टेटसला ठेवले होते. अशारितीने त्या तरुणाने त्या मुलीचे समाजात बदनामी करण्याचे कृत्य करुन तीचा विनयभंग केला. सदर प्रकाराचा जाब विचारण्यास गेलेल्या त्या मुलीच्या पित्यास त्या तरुणाने शिवीगाळ करुन धमकावले. अशा मजकुराच्या संबंधीत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 504, 506 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66, आणि पोक्सो कायदा कलम- 4, 8 , 12 अंतर्गत गुन्हा नेांदवला आहे.

हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद - पोलीस ठाणे : विशाल मत्स्य व्यवसाय संस्थेकडे घाटंग्री येथील तलावाचा ठेका नमूद संथेकडे असून सहदेव प्रभु हराळे, रा. घाटंग्री, ता. उस्मानाबाद हे त्या संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत. अंबेजवळगा तांडा येथील हरीश्चंद्र राठोड, मनोज राठोड, संजय राठोड यांसह अन्य दहा लोक असे दि. 9 ऑक्टोबर रोजी 06.30 वा. सु. नमूद तलावावर मासे धरत होते. यावेळी सहदेव हराळे यांनी त्यांना जाब विचारला असता नमूद लोकांनी हराळे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने तलावाच्या सांडव्याच्या पाण्यात ढकलून देउन कोयता, दगडाने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच मासे धरण्याचे जाळे तोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या सहदेव हराळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 427, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा -  अजिनाथ अंगद राउत, रा. जवळा (नि.), ता. परंडा हे दि. 06 ऑक्टोबर रोजी 17.30 वा. सु. आपल्या घरात होते. यावेळी नातेवाईक- बालीका बनसोडे, राणी अहिरे, अश्वकुमार अहिरे, ऐश्वर्या अहिरे, विनोद अहिरे, शितल पगारे, मनोज पगारे अशा सात व्यक्तींनी कौटुंबीक भांडणाच्या कारणावरुन अजिनाथ राउत यांच्या घरात घुसून साहित्यांची तोडफोड केली. तसेच राउत यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्याला दाव्याने फास लावून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी राउत यांचे आई- वडील त्यांच्या बचावास आले असता त्यांनाही नमूद लोकांनी मारहान केली. अशा मजकुराच्या अजिनाथ राउत यांनी दि. 09 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 452, 427, 323, 504, 506, 507, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : व्यंकट प्रकाश नागदे, रा. कराळी, ता. उमरगा हे दि. 08 ऑक्टोबर रोजी 01.30 वा. सु. कराळी शिवारातील त्यांच्या तुळजाई हॉटेलात होते. यावेळी गावकरी- अमोल जमादार, करण पाटील, विशाल आष्टे, कैलास चव्हाण अशा चौघांनी तेथे येउन पुर्वीच्या वादावरून व्यंकट नागदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली तर कैलास चव्हाण यांनी हंटरने मारहान करुन नागदे यांना जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या व्यंकट नागदे यांनी दि. 09 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.