तेरखेड्यात अडीच लाखाचा गुटखा जप्त ... आशीर्वाद कुणाचा ? 

 

येरमाळा -  वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील एका घरावर येरमाळा पोलिसांनी छापा मारून अडीच लाखाचा गुटखा जप्त करत एका इसमास ताब्यात घेतले आहे. तेरखेडा बिट अंमलदार कपिल बोरकर यांच्या आशिर्वादामुळे तेरखेड्यात हा अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री केला जात होता. 

 दिनांक 25.08.2023 रोजी 14.25 वा. सु. येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  अतुल पाटील यांना तेरखेडा येथील पठाणगल्ली मध्ये एक इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे, अशी गोपनिय बातमी मिळाली त्या आधारे येरमाळा पोलीसांच्या पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन छापा कारवाई केली असता त्यांना तृया ठिकाणी एक इसम अवैध गुटखा विक्री करताना आढळून आला. 

त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांने त्याचे नाव- अख्तर अब्दुल पठाण, वय 26 वर्षे, रा. पाठाण गल्ली तेरखेडा, ता. वाशी जि. उस्मानाबाद असे सांगून त्याच्या कडे अधीक चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्‌तर दिल्याने पथकाने सदर घराची पाहणी केली. त्यामध्ये एकुण 22 पोते प्रत्येक पोत्यात गोल्ड 9000 या कंपनीचे गुटख्याचे 50 पुडे अंदाजे 2,20,000 ₹, पांढरे रंगाचे 3 पोते ज्यात 190 गुटख्‌याचे पुडे असा एकुण 2,58,000 किंमतीचा गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी घरा मध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गुटखा विक्री करणारा इसम नामे अख्तर अब्दुल पठाण, रा. पठाणगल्ली तेरखेडा ता. वाशी याचेविरुध्द दि.25.08.2023 रोजी येरमाळा पो.ठा. येथे गुरंन 255/2023, भा.दं.वि. सं. कलम- 328, 272, 273, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक   नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी- श्री.अतुल पाटील, पोउपनि श्री. बोजगुडे, पोलीस नाईक 1555 गायकवाड, महिला पोलीस नाईक 1548 मुळे, पोलीस अंमलदार 881 जाधव यांच्या पथकाने केली.