गुंजोटी  : विद्युत पंप चोरी करतांना चोर गावकऱ्यांच्या ताब्यात

 

उमरगा : शेषेराव आयनले, रा. गुंजोटी , ता. उमरगा यांच्या शेत विहीरीवरील पानबुडी विद्युत पंपाचे वायर दि. 30 सप्टेंबर रोजी 22.00 वा. सु.विळ्याने कापून पंप चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय पवार, रा. आळंद, जि. गुलबर्गा यांस गावकऱ्यांनी पकडले. यावरुन शेषेराव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्गमध्ये चोरी 

नळदुर्ग : नळदुर्ग येथील महावितरण कार्यालयाच्या भांडार गृहातील बॅटरी संच- 9, तार- 100 मीटर, फ्युज- 12 असे 45,300 ₹ चे साहित्य दि. 25- 30.09.2021 दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सहायक अभियंता- प्रविण लक्ष्मण गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तर दुसऱ्या घटनेत भागवत पिराप्पा गुगळे, रा. व्होर्टी, ता. तुळजापूर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 0622 ही राहत्या घरासमोर लावली असता ती 29- 30.09.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या भागवत गुगळे यांनी दि. 01 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.