उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणूक,चोरी, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 

ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामस्थ- किरण हरिश्चंद्र थोडसरे यांना एका अनोळखी फोन क्रमांकावरुन दि. 24.01.2022 रोजी 15.20 वा. सु. कॉल आला. त्या समोरील महिलेने, “तुमच्या क्रेडीट कार्डची कर्ज मर्यादा वाढवण्यासाठी तुमच्या कार्डवरील 16 अंकी क्रमांक सांगा.” असे किरण थोडसरे यांना सांगीतले. यावर थोडसरे यांनी काही एक विचार न करता आपल्या 2 क्रेडीट कार्डवरील माहिती त्या समोरील महिलेस दिली. तसेच यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेले ओटीपीचे 3 लघु संदेशही त्या समोरील महिलेस सांगीतल्याने थोडसरे यांच्या बँक खात्यातून तीन व्यवहारांत एकुण 1,01,100 ₹ रक्कम कपात झाली. अशा मजकुराच्या किरण थोडसरे यांनी दि. 26 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

शिराढोण : घारगाव, ता. कळंब येथील घनश्याम विष्णुदास साळुंके यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 2394 ही दि. 23.01.2022 रोजी 15.00 वा. सु. रांजणी येथील साप्ताहीक बाजार परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या घनश्याम साळुंके यांनी दि. 26 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

ढोकी : खाजगी आराम बस चालक- शिवशंकर शाहु मेनकुदळे, रा. नायगाव, ता. कळंब हे दि. 25.01.2022 रोजी 23.45 वा. सु. ढोकी येथील पेट्रोल पंप चौकातील रस्त्याने आराम बस क्र. एम.एच. 24 एयु 3051 ही चालवत जात होते. यावेळी मुरुमड ग्रामस्थ- लहुराज नानासाहेब सवासे व गजानन कल्याण सुरवसे यांसह ढोराळा, ता. उस्मानाबाद येथील विलास नाईकनवरे या तीघांनी बसने हुलकावनी दिल्याच्या कारणावरुन ती बस आडवून चालक- शिवशंकर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. तसेच त्यांनी बसच्या समोरील काचेवर दगड फेकून मारल्याने ती काच फुटून आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या शिवशंकर मेनकुदळे यांनी दि. 26 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 427, 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.