धाराशिव शहरात कल्याण आणि मिलन डे मटका घेताना चार जणांना पकडले
धाराशिव : जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.12.05.2023 रोजी 17.55 वा. सु.आनंदनगर पो.ठा. हद्दीत 3 छापे टाकला यावेळी आगडगल्ली, उस्मानाबाद येथील- जमीर तांबोळी व संतोष सदाशिव पवार तसेच कमलाकर मसने हे तसेच पोलीस लाअर्न समोर शिफा पान स्टॉलच्या पाठीमागे पत्रयाचे शेड मध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 3,120 ₹ रक्कम बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत आनंदनगर पोठा येथे 3 वेगवेगळे गुन्हे नोंदवला आहे
धाराशिव : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद शहर पोलीसांनी दि.12.05.2023 रोजी 12.05 वा. सु. उस्मानाबाद शहर पो.ठा. हद्दीत छापा टाकला यावेळी ज्ञानेश्वर नगर येथील - असलम इकबाल पठाण हे सांजा चौक तुळजापुर बायपास रोडवरील देशमुख यांचे दुकानाच्या गाळयासमोर मिलन डे नावाचा मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 3740 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.
येरमाळा : जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.12.05.2023 रोजी 13.50 वा. सु.येरमाळा पो.ठा. हद्दीत छापा टाकला यावेळी येडेश्वरी मंदिर पाच पायरीच्या जवळ ज्योती हॉटेलसमोर येथील- महेश दिलीप हाके टायगर मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 550 ₹ रक्कम बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत आनंदनगर पोठा येथे गुन्हा नोंदवला आहे
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत आनंदनगर पोठा येथे गुन्हा नोंदवला आहे