नळदुर्गमध्ये दोन गटात तुफान हाणामारी , चार जखमी 

 

नळदुर्ग  : आरोपी नामे- 1) बिरु अंबाजी बनछेडे, 2) अंबाजी भिमराव बनछेडे,3) अप्पाराव धोंडीबा बनछेडे, 4) धोंडीराम गणपती बनछेडे, 5)अमोल धोंडीबा बनछेडे, 6) मंगल धोंडीबा बनछेडे, 7) पुनम गणपती बनछेडे, 8) रतनबाई अंबाजी बनछेडे सर्व रा. वडगाव देव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि. 02.09.2023 रोजी 09.30 वा. सु. वडगाव देव येथे रोडवर गणपती बनछेडे यांचे घरासमोर रोडवर फिर्यादी नामे- सचिन लक्ष्मण बनछेडे, वय 30 वर्षे, रा. वडगाव देव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद  व त्यांची आई सुनिता, चुलत भाउ संतोष, म्हाळाप्पा, चुलता शिवाजी, चुलती सुंदरबाई व भावजई दिपाली या सर्वांना नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून गावातील सार्वजनिक रस्त्याचे जाण्या येण्याचे कारणावरुन भांडणाची कुरापत काढून रस्ता आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्याने व काठीने लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी सचिन बनछेडे यांनी दि.03.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 341, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
नळदुर्ग : आरोपी नामे- 1) धनाजी भिमराव बनछेडे, 2) अनिकेत धनाजी बनछेडे,3) सचिन लक्ष्मण बनछेडे, 4) शिवाजी भिमराव बनछेडे, 5)संतोष कुडंलिक बनछेडे, 6) म्हाळाप्पा शिवाजी बनछेडे, 7) किसन सुभाष सोनटक्के, 8) सुभाष धोंडीबा सोनटक्के, 9) सुनिता लक्ष्मण बनछेडे, 10) सुंदरबाई कुंडलिक बनछेडे, 11) सुनिता लक्ष्मण बनछेडे, 12) विजया धनाजी बनछेडे, सर्व रा. वडगाव देव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि. 02.09.2023 रोजी 09.30 वा. सु. वडगाव देव येथे रोडवर गणपती बनछेडे यांचे घरासमोर रोडवर फिर्यादी नामे- अमोल धोंडीबा बनछेडे, वय 31 वर्षे, रा. वडगाव देव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद  व त्यांचा भाउ गणपती, चुलता अंबाजी बनछेडे, चुलत भाउ बिरु बनछेडे, वडील धोंडीबा बनछेडे, आई मंगल बनछेडे, भावजय पुनज बनछेडे, व रतनबाई बनछेडे, या सर्वांना नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून गावातील सार्वजनिक रस्त्याचे जाण्या येण्याचे कारणावरुन भांडणाची कुरापत काढून रस्ता आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्याने व काठीने लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी अमोल बनछेडे यांनी दि.03.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 427, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : आरोपी नामे- 1)परमेश्वर उर्फ गोट्या गोविंद यादव, 2) करण परमेश्वर यादव, 3) शिला परमेश्वर यादव सर्व रा. शिराढोण ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी दि.02.09.2023 रोजी 17.30 वा. सु. शिराढोण शेत शिवारात शेत गट नं 154 येथे सामाईक बांधावर फिर्यादी नामे- समाधान बालाजी यादव बालाजी रानबा शिंदे, वय 25 वर्षे,रा शिराढोण, ता. कळंब जि. उस्मानाबाद यांना नमुद आरोपीने शेतातील सामाईक बांधावर म्हैस चारण्याचे कारणावरुन जिवे मारण्याचे उद्देशाने डोक्यावर, हातावर, पाठीवर कोयता, कुह्राड व दगडाने मारुन गंभीर जखमी केले. तसेच समाधान यादव यांचे आई वडील व पत्नी यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, डोक्यावर, हातावर, पाठीवर कोयता, कुह्राडीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी समाधान यादव यांनी दि.03.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.