उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

दाभा, वडजी, हंगरगा येथे हाणामारी 
 

शिराढोण  : दाभा, ता. कळंब येथील सत्यभामा ईरगट या दि. 06.11.2021 रोजी 06.00 वा. घरासमोरील अंगनात सडा टाकत होत्या. यावेळी शेजारील- अशोक बलभीम टेळे यांनी पुर्वीच्या वादातून सत्यभामा यांना पाठीमागून लाथमारुन खाली पाडले. तसेच शिवीगाळ करुन बाजूस असलेल्या बकेटीतील पाणी सत्यभामा यांच्या अंगावर टाकून बकेट डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. यावेळी सत्यभामा यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या सुनेसही बकेट मारुन मुकामार दिला. अशा मजकुराच्या सत्यभामा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : वडजी, ता. वाशी येथील संजय विरसेन ढाकणे व बालाजी चंद्रकांत मोराळे यांच्यात घर-जागेच्या कारणावरुन जुना वाद आहे. दि. 06.11.2021 रोजी 11.00 वा. सु. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासामोर या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन बालाजी मोराळे यांनी संजय ढाकणे यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले तर संजय ढाकणे यांनी बालाजी यांचे भाऊ- जगदीश मोराळे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन त्यांच्या डाव्या हातावर सुरीने वार करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संजय ढाकणे व जगदीश मोराळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

तुळजापूर : हंगरगा (तुळ), ता. तुळजापूर येथील नन्नवरे कुटूंबातील अमर, राहुल, अमोल, नितीन, ओंकार, उमेश, सतिष, आकाश यांसह अन्य 6 व्यक्तींनी त्यांच्या शेताजवळ भांडण- तक्रारी न करण्याच्या कारणावरुन दि. 04.11.2021 रोजी 19.45 वा. हंगरगा (तुळ) शिवारात भोसले गल्ली, तुळजापूर येथील संभाजी तानाजीराव पलंगे यांना शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने नमूद व्यक्तींनी संभाजी यांच्या डोक्यात, पाठीवर, हाता-पायावर तलवार, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संभाजी पलंगे यांनी दि. 06.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149, 324, 323, 504 सह शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : हंगरगा (नळ) तांडा येथील काशीनाथ वसंत चव्हाण यांनी दि. 05.11.2021 रोजी गावकरी- कंटू किसन राठोड यांना घराजवळ फटाके वाजवण्यास मनाई केली. यावर चिडून जाउन कंटू राठोड यांसह जळकोटवाडी येथील अजय जाधव, विजय जाधव यांनी काशीनाथ चव्हाण यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, लाकडी फळीने मारहान करुन जखमी केले. यावेळी काशीनाथ यांच्या बचावास त्यांची आई आली असता त्यांसही नमूद तीघांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या काशीनाथ चव्हाण यांनी दि. 06.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.