उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 

ढोकी  : भंडारवाडी, ता. उस्मानाबाद येथील प्रविण सुभाष माळी यांच्या शेतातील शेडमध्ये कुटूंबीयांसह दि. 30- 31.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री झोपले असतांना शेडच्या दरवाजाची आतील कडी अज्ञात व्यक्तीने उचकटून आतील सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 44,400 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रविण माळी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : जिजामातानगर, तुळजापूर येथील संतोष निवृत्ती इंगळे यांच्या घरासमोरील गोठ्यात ठेवलेली त्याची तांबड्या रंगाची गाय दि. 20- 21.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संतोष इंगळे यांनी दि. 31 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा  : कदेर, ता. उमरगा येथील कैलास लक्ष्मण पाटोळे हे दि. 30- 31.12.2021 रोजी दरम्यान बाहेर गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे बंद कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आतील सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 68,800 ₹ माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या कैलास पाटोळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद : ओमनगर, उस्मानाबाद येथील राजेंद्र विठ्ठल साळुंके यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत बांधलेली त्यांची मुर्रा जातीची म्हैस दि. 23.12.2021 रोजी 03.00 ते 04.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजेंद्र साळुंके यांनी दि. 31 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.