उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 

मुरुम : चेतन तानाजी पाटील, रा. कंटेकुर, ता. उमरगा यांनी त्यांच्या कंटेकुर गट क्र. 23 मधील शेतातील पत्रा शेडमध्ये ठेवलेले 840 कि.ग्रॅ. उडीद व 200 विद्युत वायर दि. 27- 28 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या चेतन पाटील यांनी दि. 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : ओम विठ्ठल काटे, रा. जवळा, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 28- 29 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून घरातील सुवर्ण दागिने व रोख रक्कम असा एकुण 2,22,200 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या ओम काटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद   : पाटबंधारे विभाग, उस्मानाबाद येथील नागरी अभियंता- श्री. अमित जाधव हे दि. 22 सप्टेंबर रोजी कार्यालयात असतांना त्यांनी शेजारील खोलीत ठेवलेल्या पिशवीतील त्यांचा लॅपटॉप 15.30 ते 17.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या जाधव यांनी दि. 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : राम दशरथ कांबळे, रा. हंद्राळ (वाणी), ता. उमरगा यांनी त्यांची मोटारसायकल दि. 23 सप्टेंबर रोजी 22.00 वा. सु. त्यांच्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दवशी सकाळी त्यांना त्या मो.सा. चे समोरील चाक अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याचे दिसले. यावरुन राम कांबळे यांनी दि. 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.