धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

भूम, उमरगा, आंबी , तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद 
 

भूम : फिर्यादी नामे- सोमा बाबा देवळकर, वय 35 वर्षे, शेजारील महादेव नारायण देवळकर रा. वालवड, ता. भुम जि. धाराशिव या दोघांच्या राहाते घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 23.09.2023 रोजी 00.30 वा. पुर्वी 04.00 ते 04.00 तोडून प्रवेश करुन स्वयंपाक घरातील 3,000₹ रोख रक्कम सुटकेसमधील रोख रक्कम 3000₹, तसेच महादेव देवळकर यांचे घरातील 15,000₹ रोख व एक शेळी अंदाजे 5,000₹ किंमतीची असा एकुण 26,000₹ किमंतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी सोमा देवळकर यांनी दि.23.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : दि. 19.09.2023 रोजी 18.00 ते दि.20.09.2023 रोजी 10.00 वा. सु. बेडगा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील पाणीपुरवठा विहीरीवरील मोटारीचे स्टार्टर पासुन ते विहीरीतील मोटारीपर्यंतचे वायर अंदाजे 300 फुट अंदाजे 5,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी अनिल चंद्रकांत राठोड, वय 42 वर्षे, व्यवसाय ग्रामसेवक रा. बेळंब ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. बेडगा, अंबर नगर आष्टा जहागिर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

आंबी  : दि. 20.09.2023 रोजी 09.00 ते दि.22.09.2023 रोजी 09.00 वा. सु. भैरवनाथ साखर कारखाना सोनारी येथील स्टोअर रुम येथुन वेल्डींग रॉडचे दोन बॉक्स अंदाजे 7,000₹, फेवीकॉल चे दोन पॅक अंदाजे 600 ₹ असा एकुण 7,600 किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी रविकांत परमारथ सिंह, वय 56 वर्षे, व्यवसाय इंजिनिअर भैरवनाथ साखर कराखाना सोनारी, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.23.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : फिर्यादी नामे- धनंजय हरिश्चंद्र बगडी, वय 50 वर्षे, रा. मंकावती गल्ली, तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे हंगरगा तुळ शिवारातील शेतातील विहीरीवर लावलेली 03 एचपी ची मोटर अंदाजे 6,000 ₹, फिनोलेक्स कंपनीचे 19 स्प्रिंकलर नोझल अंदाजे 15,500₹, 50 फुट केबल 2,500₹ असा एकुण 24,000₹ किंमतीचा माल हा दि. 21.09.2023 रोजी 19.00 ते दि. 22.09.2023 रोजी 08.00 वा. सु.  अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी धनंजय बगडी यांनी दि.22.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.