उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 

मुरुम  : साठेनगर, मुरुम येथील-  झाकीरहुसेन आयुब बागवान यांच्या सुंदरवाडी शिवारातील शेत गट नं 39/1/2 मध्ये अर्धबंदीस्त गोठ्याचे तारा व लोखंडी ॲगल अज्ञात व्यक्तीने दि.22.02.2023 रोजी 23.00 ते दि.23.02.2023 रोजी 07.00 वा.सु. तोडून शिरोही जातीचे बोकड 90 किलोचे किंमत अंदाजे 70,000 ₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या झाकीरहुसेन बागवान यांनी दि. 23.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : अचलेर, ता. लोहारा येथील- तानाजी श्रीमंत रुपनुर यांचे अंदाजे 80,000 ₹ किंमतीचे मळणीयंत्र हे मड्डी सलगर शिवारातील विष्णू माने यांच्या शेतातुन दि.14.02.2023 रोजी 19.00 ते दि. 15.02.2023 रोजी 06.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या तानाजी रुपनुर यांनी दि. 23.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : बेळंब, मुरुम येथील- प्रकाश बाबुराव बोडरे यांच्या शेतातील अॅल्युमिनीयम लघुदाब वाहीनी 480 मिटर तार अंदाजे 14,400 ₹ किंमतीचे ही दि.16.02.2023 रोजी 22.00 ते 17.02.2023 रोजी 05.00  वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राम मोतीराम कोळी धंदा नोकरी रा. संभाजीनगर, मुरुम यांनी दि. 23.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : मसला (खु), ता. तुळजापूर येथील- घनशाम त्रिंबक निंबाळकर यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची होडां शाईन मोटारसायकल क्र.एम.एच.25 एएन 4798 ही दि.25.10.2022 रोजी 21.30 ते 18.00 दि. 26.10.2022 रोजी 05.00 वा. दरम्यान राहुल काने यांच्या घरा समोरून तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या घनशाम निंबाळकर यांनी दि. 23.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

 उस्मानाबाद  : खाजानगर, उस्मानाबाद येथील- साबेर चौधरी, फैजल चौधरी, अन्य 7ते 8 या सर्वांनी जुन्या वादावरुन दि. 23.02.2023 रोजी 17.30 वा. दरम्यान महात्मा गांधीनगर गट नं 164/7 गावकरी- कमल दगडू सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. कमलचे पती कमलच्या बचावासाठी आले आसता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कमल सुर्यवंशी यांनी दि.23.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.