उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद  : येडशी येथील द्वारका तुकाराम बेदरे, वय 55 वर्षे या दि. 16.11.2021 रोजी रात्री 00.45 वा. त्यांच्या घरात एकट्या असतांना घराचा कडी- कोयंडा तोडल्याचा त्यांना आवाज आल्याने त्यांनी दरवाजाकडे धाव घेतली. यावेळी सहा अनोळखी पुरुषांनी श्रीमती बेदरे यांना ढकलून घरात ढकलून त्यांना लाकडी दांड्याने मारहान करुन त्यांच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण मंगळसुत्र व घरातील कपाटात ठेवलेले 69 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने जबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या द्वारका बेद्रे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 397 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : भोत्रा शेतवस्ती, ता. परंडा येथील रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांच्या वस्तीवर लावलेल्या ट्रॅक्टरचे (साखळी, क्रॉस जॉईंट, हॅन्डल, बॅटरी, टॉर्च, पट्टी पाने) किं.अं. 7,700 ₹ चे साहित्य दि. 02.11.2021 रोजी 09.00 वा. सु. वहाडा, ता. शेवनगाव, जि. हिंगोली येथील शिवाजी लोकरे, गजानन लोकरे, रामेश्वर लोकरे यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या रणजीत पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : येरमाळा ग्रामस्थ- विलास गोरोबा थोरबोले यांनी त्यांचा हिरव्या रंगाचा ट्रक क्र. एम.एच. 04 एएल 6830 हा दि. 14.11.2021 रोजी 22.00 वा. सु. गावातील विवेक हॉटेलसमोर लावला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वा. तो ट्रक त्यांना लावल्या जागी न आढळल्याने कोण्या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याचे समजले. अशा मजकुराच्या विलास थोरबोले यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर: तुळजाभवानी मंदीरातील गर्दीचा फायदा घेउन दि. 16.11.2021 रोजी 11.00 वा. सु सोलापूर येथील सचिन जाधव, रामु जाधव, मरगु गायकवाड, भिमराव जाधव यांनी कर्नाटक राज्यातील उत्तमसिंग ठाकुर यांच्या विजारीच्या खिशातील 5,300 ₹ रक्कमेसह एक डेबिट कार्ड असलेले पॉकेट चोरुन नेले. अशा मजकुराच्या उत्तमसिंग ठाकुर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : केशेगाव, ता. उस्मानाबाद येथील श्रीशैल्यप्पा महालिंगप्पा वाघाळे हे दि. 16.11.2021 रोजी 11.30 वा. सु. उस्मानाबाद येथील बँक ऑफ इंडीया शाखेसमोर त्यांच्या मोटारसायकलवर बसले होते. यावेळी एका अनोळखी पुरुषाने 10-10 ₹ च्या चार नोटा वाघाळे यांच्या मो.सा. मागे पडलेल्या असल्याचे वाघाळे यांना सांगीतले. यावर वाघाळे हे मो.सा. वरुन उतरुन त्या नोटा गोळा करु लागताच त्या भामट्याने वाघाळे यांच्या मो.सा. च्या हॅन्डलला अडकवलेली पिशवी आतील 80,000 ₹  सह चोरुन नेली.