उस्मानाबाद जिल्ह्यात २५ नोव्हेंबर रोजी चोरीच्या पाच घटना 

 

उस्मानाबाद : संजीतपूर, ता. कळंब येथील शिवाजी बाराते यांनी त्‍यांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 7202 ही दि. 22.11.2021 रोजी 15.30 वा. सु. तहसील कार्यालय, कळंब समोर लावली असता अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली.

            दुसऱ्या घटनेत खामसवाडी ग्रामस्थ- मंगेश शेळके यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल दि. 21.11.2021 रोजी 14.00 वा. सु. गावातील शाहु मल्टीस्टेट कॉ. ऑ. क्रेडीट सोसायटी च्या शाखेसमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या शिवाजी बाराते व मंगेश शेळके यांनी दि. 24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हे कळंब व शिराढोन पो.ठा. येथे नोंदवले आहेत.

उस्मानाबाद  : सांजा रोड, उस्मानाबाद येथील यतीन पुजारी हे कुटूंबीयांसह दि. 17- 18.11.2021 दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील साहित्य अस्थाव्यस्थ टाकले तसेच शेजारील रस्तोगी  व पंडीत यांच्याही घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या यतीन पुजारी यांनी दि. 24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : तेर, ता. उस्मानाबाद  ग्रामस्थ- मुसेब मुकरम काझी यांच्या गट क्र. 538 मधील शेतातील गुदामाची सिमेंट खिडकी दि. 22- 23.11.2021 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून गुदामातील 60 पोती सोयाबीन चोरुन नेले. अशा मजकुराच्या मुसेब काझी यांनी दि. 24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : तडवळा शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर उड्डान पुलाचे बांधकाम भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉन लि. मार्फत चालू आहे. सांजा, ता. उस्मानाबाद येथील अजय तुकाराम दाणे यांनी दि. 22.11.2021 रोजी 16.00 ते 18.00 वा. दरम्यान त्या बांधकामातील सुमारे 400 कि.ग्रॅ. वजनाची 12 मिमी व्यासाच्या लोखंडी सळया कापून ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 एजे 2027 मधून चोरुन नेत होते. दरम्यान तुळजापूर- उस्मानाबाद रस्त्यावरील जम्मु ढाब्याजवळ त्यांस पोलीसांची चाहूल लागताच ढाब्याजवळ वाहन लाऊन पसार झाले. अशा मजकुराच्या बांधकाम कंपनीचे प्रतिनिधी- समाधान सुर्यभान यादव, रा. करजखेडा यांनी दि. 24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.