धाराशिव जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल 

 

उमरगा : फिर्यादी नामे- श्रीकृष्ण बलभीम जाधव, गुरुवाडी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे गावाकडे जात असताना दि.25.08.2023 रोजी 01.45 वा. सु. गुरुवाडी जाणारे रोडवर रामराव घोडके यांचे शेताजवळ अनोळखी तीन इसमांनी त्यांची मोटरसायकल श्रीकृष्ण जाधव यांचे मोटरसायकलला समोर आडवी लावून लाथाबुक्यानी,हंटरने मारहान करुन त्यांचे खिश्यातील रोख रक्कम 4,700 ₹ व विवो कंपनीचा मोबाईल फोन 5,000 असा एकुण 9,700 ₹ किंमतीचा माल बळजबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या श्रीकृष्ण जाधव यांनी दि.25.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 394 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : दि.19.08.2023 रोजी 13.00 ते दि.22.08.2023 रोजी 09.00 वा. सु. पुर्वी मौजे तेर येथील अंगणवाडी क्र 202 रुमचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडुन आत प्रवेश करुन काळ्या रंगाचा 32 इंची एल. ई. डी. टी. व्ही. त्यावर महाराष्ट्र शासन असे लिहलेले किंमत अंदाजे 10,000₹, एक वजन काटा 2000₹ असा एकुण 12,000₹किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या अंगणवाडी सेविका फिर्यादी प्रभावती केशव वाघमारे, वय 64 वर्षे रा. भिमनगर, तेर ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.25.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- गोजराबाई गोविंद नलावडे, वय 70 वर्षे, रा.राघुचीवाडी, ता. जि. उस्मानाबाद यांचे राहते घराच्या पाठीमागील दरवाज्याचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.24.08.2023 रोजी 23.30 ते दि. 25.08.2023 रोजी 05.30 वा. सु. उचकटून आत प्रवेश करुन घरातील लोखंडा पलंगाच्या खाली ठेवलेली लोंखडी पत्राच्या पेटीतील रोख  25,000 ₹, 94 ग्रॅम वाजनाचे सुवर्ण दागिने व 1440 ग्रॅम वाजनाचे चांदीचे दागिने असा एकुण 5,23,400किमंतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या गोजराबाई नलावडे यांनी दि.25.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे- मधुमती महादेव सुरवसे, वय 42 वर्षे, रा. खंडाळा ता. तुळजापूर यांचे खंडाळा शिवारातील शेत गट नं 116 मधील विहीरीतुन तीन एच पी अंजिठा कंपनीची पाणबुडी मोटार अंदाजे 6,000 ₹ किंमतीची ही दि.23.08.2023 रोजी 17.00 ते दि.24.08.2023 रोजी 17.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी मधुमती सुरवसे यांनी दि.25.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : दि. 28.08.2023 रोजी सुमारे 06.00 वा. सुमारास येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील नॅशनल हायवे 52 वर रत्नापूर पाटीजवळ फिर्यादी नामे- अशरफ रहेमान शेख, वय 25 वर्षे रा. हरसुल ता. जि. औरंगाबाद याचे मालकीच्या ट्रक मधील एलाईड ब्लेडर्स ॲण्ड डिस्टर्लस लि. कंपनीच्या ऑफिसर चॉईस ब्रॅड असलेले विदेशी मद्याचे 34 बॉक्स प्रत्येकी 750 मिलीच्या प्लास्टिकच्या 408 बाटल्या प्रति बॉक्स 680 प्रमाणे एकुण किंमत 23,120 ₹ हे दि.28.08.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने बाहेर फेकुन चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी अशरफ रहेमान शेख यांनी दि.25.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.