धाराशिव जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल 

 

कळंब  : फिर्यादी नामे- आसिफ महेबुब अतार, वय 27 वर्षे, धंदा तलाठी, रा. खामसवाडी, ता. कळंब जि. उस्मानाबाद, यांचे ईटकुर येथील तलाठी कार्यालयाचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.11.08.2023 रोजी 16.00 ते दि. 14.08.2023 रोजी 09.50 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लाकडी टेबलच्या ड्रायवरमध्ये ठेवलेले 10,350/- ₹ चोरुन नेले.अशा मजकुराच्या आसिफ अतार यांनी दि.14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापुर  : फिर्यादी नामे-विवेक दिनकर कदम, वय 36 वर्षे, रा. मंकावती गल्ली, तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे श्री. तुळजाभवानी मंदिरातील आरती मंडपा मध्ये मौजे तुळजापुर येथे फिर्यादी यांचे धोतराचे कंबरपट्यामध्ये ठेवलेले लहाण पॉकेट व त्यामधील दोन चांदीच्या अंगठ्या व रोख रक्कम 500/- रु असा एकुण 6,400 रु किंमतीचा माल हा दि. 13.08.2023 रोजी 20.00 वा. सु. अज्ञात स्त्रीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या विवेक कदम यांनी दि.14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

धाराशिव  : फिर्यादी नामे- सुधाकर ज्योतीराव निकम, वय 64 वर्षे, रा. खानापूर ता.जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 70,000₹  किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 25 एडी 1573 जिचा. चेसी नं. AIBSI1515 ही. दि.31.07.2023 रोजी 12.30 ते दि.05.08.2023 रोजी 14.00 वा. सु. मोहन केसकर यांचे शेतात खानापूर शिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुधाकर निकम यांनी दि.14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

उमरगा  :मुळज ता. उमरगा जि. उस्मानाबाद शिवारातील कोल्हापूर बंदाऱ्याचे एकुण 28 लोखंडी गेट अंदाजे 39,200 ₹ किंमतीचे हे दि. 18.07.2023 रोजी 00.00 ते 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवशंकर मधुकर बिद्री, वय 40 वर्षे, धंदा ग्रामसेवक, रा. पतंगे रोड उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

अंबी  :फिर्यादी नामे- विजय नारायण जगताप, वय 41 वर्षे, रा. तांदुळवाडी ता. परंडा जि. उस्मानाबाद यांचे अंदाजे 60,000₹ किंमतीचे दोन बैल हे जगताप वस्ती तांदुळवाडी येथुन दि.13.08.2023 रोजी 21.30 ते दि. 14.08.2023 रोजी 06.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विजय जगताप यांनी दि.14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अंबी पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.