तुळजापुरात तीन जिवंत काडतुसांसह पाच आरोपी अटकेत
तुळजापूर : उस्मानाबाद - लातूर रस्त्यावरील पाचुंदा तलावाजवळ दोन पुरुष गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून असल्याची गोपनीय खबर तुळजापूर पो.ठा. च्या पथकास दि. 30.12.2021 रोजी 16.45 वा. सु.मिळाली होती. यावर पथकाने लागलीच पाचुंदा तलाव परिसर गाठून खंडाळा, ता. तुळजापूर येथील राजेंद्र सुरेश कांबळे यांसह एका अल्पवयीन मुलास (विधी संघर्षग्रस्त बालक) पिस्टलसह ताब्यात घेतले होते.
उपरोक्त प्रकरणी दाखल असलेल्या तुळजापूर पो.ठा गु.नों.क्र. 465 / 2021 शस्त्र कायदा कलम- 36, 25 सह 188, 34 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 37, 135 च्या उर्वरीत तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सई भोरे-पाटील व तुळजापूर पो.ठा. चे पोनि अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- सुशील चव्हाण, ज्ञानेश्वर कांबळे, पोउपनि- राहुल रोटे, . चनशेट्टी, पोहेकॉ- अजय सोनवणे, अतुल यादव, पोना- गणेश माळी, लक्ष्मी चव्हाण, अमोल भोपळे, गणेश पतंगे, अजित सोनवणे, बाळासाहेब देवबोणे यांच्या पथकाने तुळजापूर येथील 1) सचिन खंडु जाधव, वय 29 वर्षे 2) शैलेश श्रीकांत नरवडे, वय 23 वर्षे 3) विश्वजीत विजय अमृतराव, वय 25 वर्षे 4) सौरभ दत्तात्रय टोले, वय 22 वर्षे यांसह उस्मानाबाद येथील 5) मयुर बापु बनसोडे, वय 26 वर्षे यांना दि. 13 जानेवारी रोजी ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे 4 पिस्टल सह 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
तुळजापूर पोलीसांनी केलेल्या या यशस्वी कामगीरीचे पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.