विविध गुन्ह्यांतील 5 आरोपींना आर्थिक दंडाच्या शिक्षा

 

अंबी  : प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी अंबी पो.ठा. गु.र.क्र. 108, 110, 113, 115, 116/ 2021 या पाच गुन्ह्यात काल दि. 29 जुलै रोजी खालील प्रमाणे शिक्षा सुनावल्या.

यात सार्वजनिक ठिकाणी अग्नी विषयक निष्काळजीपनाचे कृत्य करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केल्याप्रकरणी 1) रामदास गोविंद ईटकर 2) गणेश भाऊसाहेब देवकर, दोघे रा. सोनारी यांना प्रत्येकी 500 ₹ दंड व दंड न भरल्यास सात दिवस साध्या कारावासाची शिक्षा तसेच जुगार खेळून म.जु.का. कलम- 12 (अ) व भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन केल्याप्रकरणी 3) पिनू केरबा वाडेकर, रा. सोनारी याना 800 ₹ दंड व दंड न भरल्यास चार दिवस साध्या कारावासाची शिक्षा आणि जुगार खेळून म.जु.का. कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्रकरणी 4) प्रभू सोपान लांडगे, रा. कूक्कडगाव यांना 300 ₹ दंड व दंड न भरल्यास पाच दिवस साध्या कारावासाची शिक्षा व सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायरित्या वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याप्रकरणी 5) सरताज आझाद शेख यांना 200 ₹ दंड व दंड न भरल्यास दोन दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  : सोहेल रशीद शेख, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 29 सप्टेंबर रोजी 11.15 वा. सु. बेंबळी येथील सार्वजनिक रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 25 एफ 7047 हा रहदारीस धोकादायपने उभा केला. तर सचिन श्रावण कांबळे, रा. तुगाव (जुने), ता. उमरगा यांनी येणेगूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 12 सीएच 6415 हा रहदारीस धोकादायपने उभा केला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.