तुळजापूर, परंडा येथे चोरीचा गुन्हा दाखल 

 

तुळजापूर : शंकर बिभीषण लोभे, रा. तुळजापूर यांच्या काक्रंबा गट क्र. 370 मधील शेतातील 3 अश्व शक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 11- 12 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या शंकर लोभे यांनी दि. 14 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.स. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : तामीळनाडू येथील ऑडीस्वामी देवर हे हल्ली परंडा येथे राहत असून दि. 11 सप्टेंबर रोजी त्यांच्या गणेश या नोकराने त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 4319 ही कामानिमीत्त मागुन नेली परंतु ती मोटारसायकल अद्याप पावेतो परत केली नाही. अशा मजकुराच्या देवर यांनी दि. 14 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

बेंबळी  : राजुरी येथील रेश्‍मा साळुंके यांच्या मुलीचा चुलत बहिणीसोबत वाद झाला होता. यातून चिडून जाउन भाऊबंद बबलू व जयमाला साळुंके या पती- पत्नींसह 8 व्यक्तींनी दि. 11 सप्टेंबर रोजी 13.00 वा. राहत्या गल्लीत रेश्मा व त्यांचा मुलगा सुरज यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रेश्मा साळुंके यांनी दि. 14 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.