कोविड- 19 संदर्भाने जारी मनाई आदेश झुगारणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

तामलवाडी  : कोंविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मा. जिल्हाधिकारी यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतानाही तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी ग्रामस्थ- रत्ना अनिल कोळेगर यांनी  दि. 25.01.2022 रोजी 10.30 वा. सु. राहत्या गावात ते मनाई आदेश झुगारुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले. यावरुन तामलवाडी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- करीम शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणूक

भुम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भुय येथील जानेवारी- 2013 ते मार्च- 2018 या कालावधीत तत्कालीन प्राचार्य- बिभीषन पंढरीनाथ भैरट यांनी महाविद्यालयाच्या किर्द खतावणीमध्ये बनावट देयके तयार करुन, सह्या करुन मुख्य लेखापरिक्षणात खाडाखोड करुन एकुण 7,54,866 ₹ रकमेचा फेरफार करुन संस्थेची व शासनाची फसवणूक केली. अशा मजकुराच्या विद्यमान प्राचार्य- श्रीकृष्ण चंदनशिव यांनी दि. 25.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 471, 468, 409 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

विनयभंग

उस्मानाबाद  : एक 21 वर्षीय महिला दुकानला जात असतांना गावातीलच एक तरुण मागील काही महिन्यांपासून वेळोवेळी तीचा पाठलाग करुन तीच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. दि. 23.01.2022 रोजी 08.30 वा. सु. ती महिला दुकानला गेली असता त्या तरुणाने परत तीचा पठलाग करुन तीच्याकडे लैंगीक अनुग्रहाची मागणी करुन तीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या त्या महिलेने दि. 25 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.