रुई,  जागजी, सलगरा, गोविंदपूर येथे हाणामारी 

 

ढोकी  : रुई, ता. उस्मानाबाद येथील कोकाटे कुटूंबीयांतील मोहन, चंद्रकांत, अशोक, रुक्मीण, ज्योती यांसह तडवळा (क.) येथील पांडुरंग होगले असे सहाजण दि. 29.10.2021 रोजी 10.00 वा. सु. रुई ग्रामस्थ- वैशाली रुईकर यांच्या शेतातील सोयाबीनची मळणी करत होते. यावेळी वैशाली यांनी सोयाबीन मळणी न करण्यास सांगीतले असता नमूद सर्वांनी वैशाली यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच यावेळी रुक्मीण यांनी वैशाली यांच्या हातावर विळ्याने वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या वैशाली रुईकर यांनी दि. 30.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत जागजी येथील प्रभावती महादेव सावतर व शितल रामेश्वर सावतर कुटूंबात दि. 28.10.2021 रोजी घरासमोर वाद झाला. यात शितल यांसह कुटूंबीय रामेश्वर, अतुल यांनी प्रभावती यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करुन दगड फेकुन मारल्याने प्रभावती यांचा एक दात निखळून पडला. अशा मजकुराच्या प्रभावती यांनी दि. 30.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : सलगरा (दि.), ता. तुळजापूर येथील पांडुरंग लोमटे, शिलू लोमटे, संदिप लोमटे यांनी त्यांच्या शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरुन किलज येथील विवेकानंद सोमवंशी यांना दि. 27.10.2021 रोजी 14.30 वा. सु. सलगरा शिवारात विवेकानंद यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्या व दगडाने मारहान केल्याने विवेकानंद यांच्या एका दाताचा तुकडा पडला. अशा मजकुराच्या विवेकानंद यांनी दि. 30.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : गोविंदपुर येथील छाया बालाजी मुंढे व पार्वती शंकर मुंढे या दोन्ही कुटूंबात जुना वाद आहे. यातुनच दोन्ही कुटूंबात दि. 22.10.2021 रोजी भांडण, मारामाऱ्या झाल्या. या प्रकरणी छाया मुंढे यांनी दि. 29.10.2021 रोजी प्रथम खबर दिली की, गणपत दासा मुंढे व शंकर मुंढे या दोघा भावांसह अन्य 6 व्यक्तींनी पुर्वीच्या वादावरून छाया मुंढे यांच्या घरात घुसून त्यांच्याजवळ त्यांच्या पतीची विचारपूस करुन छाया यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन त्यांच्या डोक्यास बंदुक लावली. तर पार्वती मुंढे यांनी काल दि. 30.10.2021 रोजी प्रथम खबर दिली की, बालाजी व दिनेश सखाराम मुंढे या दोन भावांनी पार्वती शंकर मुंढे यांना शिवीगाळ, मारहान करुन चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन भा.दं.सं. कलम- 143, 144, 147, 148, 149, 452, 323, 506 सह शस्त्र कायदा कलम- 3, 25 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.