उस्मानाबादेतील वृद्ध इसमाची नातेवाईकाकडून फसवणूक 

 

उस्मानाबाद  : भालचंद्र शंकरराव कासार, वय 82 वर्षे, रा. सारोळा (बु.), ता. उस्मानाबाद हे वार्धक्याने आजारी असून बँक, पतसंस्थेतील खात्यातून रक्कम काढण्यासाठी आपल्या नातेवाईकांची मदत घेत असत. या संधीचा गैरफायदा घेउन पुणे येथील नातेवाईक शकुंतला मोरे यांसह आशिष व सुकन्या जाधव या दोघा पती- पत्नींनी जानेवारी ते जुलै 2021 दरम्यान भालचंद्र कासार यांच्या बँक व पतसंस्थेच्या खात्यांतून वेळोवेळी एकुण 9,86,000 ₹ रक्कम विश्वासघाताने काढून घेतली. अशा मजकुराच्या भालचंद्र कासार यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुने भा.दं.सं. कलम- 420, 406, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

परंडा  : रविंद्र राजेंद्र पांचाळ, रा. तेर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एई 7915 ही दि. 26 सप्टेंबर रोजी 12.05 ते 15.00 वा. दरम्यान परंडा येथील भुईकोट किल्ल्याच्या द्वारासमोर लावली असता अज्ञाताने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या पांचाळ यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : कडकनाथवाडी शिवारातील रिलायन्स जिओ मनोऱ्याच्या वायरचे चार तुकडे असे एकुण 360 मीटर वायर दि. 21 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या तांत्रिक- राजकुमार चौधरी यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.