उस्मानाबादेत हुंडाबळी 

नवविवाहित महिलेची आत्महत्या, सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल 
 

उस्मानाबाद - माहेराहून चार लख आणि दीड तोळे सोने घेऊन ये म्हणून छळ आणि जाच केल्यामुळे शहरातील एका नवविवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली आहे. 

श्रीमती मनिषा सुरज माळी, वय 22 वर्षे, रा. उस्मानाबाद यांनी दि. 18 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. मनिषा यांनी माहेरहुन 4,00,000 ₹ रक्कम व 150 ग्रॅम सुवर्ण आनावेत यासाठी पती- सुरज तुळशीराम माळी, सासरा- तुळशीराम माळी, सासु- ललीता, नणंद- स्वाती भोसले व अन्य एक स्त्री अशा सर्वांनी सप्टेंबर 2020 पासून वेळोवेळी मनिषा यांचा शारिरीक- मानसिक छळ केला. 

या छळास कंटाळून मनिषा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयतेचे पिता- बसप्पा बनसोडे, रा. सुर्डी, ता. उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
सोयाबीनचा ढिग पेटवून नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामलवाडी  : लिंबा गंगाराम डोंगरे, रा. मसला (खु.), ता. तुळजापूर यांनी त्यांच्या शेतातील बांधावर अंदाजे 16 क्विंटल सोयाबीन उत्पादन होईल असा सोयापिनचा ढिगारा लावला होता. दि. 17- 18 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री गावातीलच एका संशयीताने तो ढिगारा पेटवून डोंगरे यांचे आर्थिक नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या लिंबा डोंगरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.