धाराशिव :  डी मार्टजवळ ट्रकची मोटारसायकलला धडक, एक ठार, दोन जखमी 

 

धाराशिव  : - फियादी नामे- रविंद्र जगन्नाथ राठोड, वय 38 वर्षे, सोबत मेव्हणी बालिका राठोड व तिची मुलगी ऐश्वर्या महादेव राठोड, वय 2 वर्षे, रा. कौडगाव तांडा, ता. जि. उस्मानाबाद हे तिघे  मोटरसायकल क्र एमएच 25 व्ही 4091 पॅशन प्रो वरुन  दि. 01.08.2023 रोजी 12.15 वा. सु. डी मार्ट पासून थेडे पुढे राजे निंबाळकर यांच्या शेता लगत उसृमानाबाद येथुन जात होते. 

दरम्यान  ट्रक क्र एमपी 09 एचएच 1803 चा चालक आरोपी नामे 1)सखाराम मुरार धनगर, वय 58 वर्षे, रा. हातनावर पोस्ट पगारा ता. धर्मपूरी जि. धार राज्य मध्यप्रदेश, आरोपी नामे 2) लाखणसिंह बदामसिंह पटेल, वय 42 वर्षे रा. ग्राम एकलरा बुजर्ग पोस्ट पंगारा ता. धर्मपुरी जि. धार राज्य मध्यप्रदेश यांनी त्यांचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून रविंद्र राठोड यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात  ऐश्वर्या राठोड ही मयत झाली. तर बालिका राठोड या गंभीर व किरकोळ जखमी झाल्या. तसेच रविंद्र राठोड यांचे गाडीचे नुकसान झाले. अशा मजकुराच्या रविंद्र राठोड यांनी दि.01.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279,  337, 338, 304 (अ), 427 सह मो.वा. का. कलम 184, 134 अ ब अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मुरूमजवळ अपघात 

मुरुम  :जखमी नामे-जुल्फेकार जाफर शेडमवाले, वय 40 वर्षे रा. दाळींब ता. उमरगा जि. उस्मानाबाद सोबत मुलगा नामे- आरमान जुल्फंकार शेडमवाले हे दोघे दि.27.07.2023 रोजी 07.30 वा. सु. दाळींब शिवारात पांडुरंग मुरमे यांचे शेताजवळ ॲपेरिक्षा क्र एमएच 25 एक्स 790 मध्ये असताना  ट्रॅव्हल्स क्र एमएच 09 पीए 0407 चा चालक आरोपी नामे- अहमदअली शुकुर मौजण रा नळदुर्ग ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी त्यांचे ताब्यातील  ट्रॅव्हल्स ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून ॲपेरिक्षाला पाठीमागून धडक दिली. या आपघातात जुल्फेकार शेडमवाले व त्यांचा मुलगा आरमान हे दोघे गंभीर व किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या जुल्फेकार शेडमवाले यांनी दि.01.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279,  337, 338, मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

लाथाबुक्यांनी मारहाण 

भूम : आरोपी नामे-1)सोन्या ऊर्फ गौतम लानुदास हाळनावर रा. मोहरी, ता. जामखेड जि. अहमदनगर यांनी दि. 31.07.2023 रोजी 18.15 वा. सु. फिर्यादीचे घरी सामनगाव ता. भुम येथे फिर्यादी नामे- भाउसाहेब बिरमल सोट, वय 34 वर्षे, रा. सामनगाव, ता. भुम जि. उस्मानाबाद यांना तु माझे पत्नीला का बोलला असे म्हणून गौतम हाळनावर यांनी भाउसाहेब सोट यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन  जखमी केले. तसेच गौतम हाळनावर यांचे बचावास त्यांचा मुलगा मनोज सोट हे आला असता त्यासही दगडाने कपाळावर मारुन गंभीर जखमी करुन त्यांच्या पत्नी पल्लवीस शिवीगाळ करुन मारहान केली. अशा मजकुराच्या भाउसाहेब सोट यांनी दि.01.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 323, 504अन्वये गुन्हा नोंदवला आहे.