तुळजापुरात महिंद्रा फायनान्सच्या वसुली वसूल एजंटाकडून कर्जदारांची फसवणूक

 

तुळजापूर  : बाकली, ता. शिरुर (अ.), जि. लातूर येथील सचिन जिवनराव बसपुरे हे महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लि. च्या तुळजापूर येथील शाखेत वसूलदार म्हणून कामास आहेत. त्यांनी फेब्रुवारी 2018 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत महिंद्रा फायनान्सच्या कर्जधारकांकडुन कर्जाच्या हप्त्याची वसुली करुन काही कर्जधारकांना बनावट पावती देउन तर काहींना पावती न देता बसपुरे यांनी एकुण 7,52,371 ₹ परस्पर गोळा करुन त्या रकमेचा अपहार करुन महिंद्रा फायनान्स व संबंधीत कर्जधारकांची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या सहव्यवस्थापक- हनुमंत बलभीम घोगरे यांनी दि. 18.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 408 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
महिलेने केली फसवणूक 

परंडा  :  खंडोबा चौक, परंडा येथील श्रीमती राखी फारुक शेख, यांनी दिवाणी न्यायालय व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांच्याकडे किरकोळ फौजदारी अर्ज 31 / 2020 मधील अर्जदार क्र. 3) श्रीमती- रहेमखातून महेबूब गीड्डे तसेच पीडब्ल्युडीव्ही अर्ज क्र. 17 / 2020 मधील अर्जदार क्र. 1) श्रीमती राखी फारुक शेख या दोन नावांच्या व्यक्ती या एकच म्हणजे मी स्वत: असल्याचे वकिलामार्फत न्यायालयात कथन केले. 

तसेच या दाव्यापोटी त्यांनी स्वत:सह आपल्या पती व मुलांची खोटी नावे वापरुन खोट्या कथनाची पत्रे दि. 15.02.2021 रोजी न्यायालयात प्रस्तुत केली. अशा प्रकारे त्यांनी न्यायालयाची दिशाभूल करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा मजकुराच्या संबंधीत न्यायालयाचे सहायक अधीक्षक- श्री. हमीद पठाण यांनी दि. 18.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 468, 471 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.