उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, अपहरण, मारहाणीचे गुन्हे दाखल 

 

मुरुम : कंटेकूर, ता. उमरगा येथील श्रीमती- मंगल लक्ष्मण शेवाळे यांनी दि. 18.10.2021 रोजी 11.00 वा. घर कुलूपबंद करुन किल्ली बाहेरील देवळीत ठेउन शेतात गेल्या होत्या. 13.30 वा. त्या घरी परतल्या असता त्यांना समजले की, त्या किल्लीच्या सहायाने घर उघडून घरातील 22 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरीस गेले आहेत. हे दागिने गावातीलच दोघा तरुणांनी चोरुन तीसऱ्या एका व्यक्तीकडे ठेवले आहेत. अशा मजकुराच्या मंगल शेवाळे यांनी दि. 06.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : बाबानकर, कळंब येथील अमोल यादव यांचे बोलेरो पिकअप वाहन क्र. एम.एच. 13 एएन 6274 हे दि. 03- 04.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. अशा मजकुराचया यादव यांनी दि. 07 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  : तुगांव, ता. उस्मानाबाद येथील नागनाथ कलाल हे दि. 06.12.2021 रोजी 19.00 वा. उस्मानाबाद न्यायालय ईमारतीसमोरील एका हातगाड्यावर पाणीपुरी खात होते. यावेळी बाजूच्या खुर्चीत ठेवलेला त्यांचा स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरला. अशा मजकुराच्या कलाल यांनी दि. 07 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

मुरुम  : चिंचोली (भु.), ता. उमरगा येथील करण तानाजी कांबळे हा 16 वर्षीय मुलगा दि. 01.12.2021 रोजी 11.00 वा. सु. खेळण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा घरी न परतल्याने कुटूंबीयांनी त्याचा शोध घेतला असता तो आढळून न आल्याने कोण्या अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलाचे पिता- तानाजी कांबळे यांनी दि. 07 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

भूम   : आष्टी, जि. बीड येथील शाबीर पठाण यांना ठार मारण्याच्या उद्देशाने बेदरवाडी, भुम येथील विष्णु व नंदकुमार वनवे या पिता- पुत्रांसह विलास नावाच्या व्यक्तीने दि. 12- 13.10.2021 दरम्यानच्या रात्री भूम येथे ट्रॅक्टरवरुन खाली ढकलून दिल्याने ते जखमी झाले. यावर पठाण यांनी वैद्यकीय उपचाराकामी त्या तीघांना विनंती केली असता नमूद तीघांनी पठाण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या शाबीर पठाण यांच्या प्रथम खबरेवरुन जामखेड पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 307, 323, 504, 34 अंतर्गत नोंदवण्यात आलेला गुन्हा पुढील तपासकामी तो गुन्हा भुम पोलीसांना प्राप्त झाला आहे.

 
मुरुम  : काटेवाडी येथील दिनकर भोसले हे दि. 05.12.2021 रोजी 19.30 वा. सु. गावातील एका किराणा दुकानासमोरच्या रस्त्यावर उभे होते. यावेळी मद्यधुंद ग्रामस्थ- गणेश पाटील यांनी दिनकर यांना शिवीगाळ केली. यावेळी दिनकर यांच्या बचावास मुलगा- अभिषेक आला असता ग्रामस्थ- किसन भोसले यांसह त्यांचा मुलगा- नंदकिशोर व गोपाळ यांनी गणेश पाटील यांची बाजू उचलून धरली. या वादातून नमूद चौघांनी दिनकर व अभिषेक भोसले या पिता- पुत्रांस काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन शिवीगाळ केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिनकर भोसले यांनी दि. 07 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.