उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 

उमरगा  : आरोग्य नगरी कानडे हॉस्पीटलचे गेट  समोर उमरगा येथुन  होंडा शाईन कंपनीची मोसा क्रमांक एम एच 39 के ए 3665 ही दिनांक 09 जानेवारी 14.10 वा सु कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे अशा मजकुराच्या लोभाजी प्रकाशराव बिरादार,रा. साईधाम उमरगा यांनी दिले फिया्रद वरुन  अज्ञात व्यक्ती विरुध्द भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : दाउतपुर ता.उस्मानाबाद  येथिल दत्तात्रय क़ष्णा थोरात वय 40 वर्ष यांचे राहते घरी दिनांक 09.01.2022 रोजी 00.00 ते 03.00 वा चे दरम्यान दरवाज्याचे वरचे फटेतुन घरात उतरुन उशाला ठेवलेला रेडी मी 8 ए मॉडेलचा काळे रंगाचा जुना वापरता मोबाईल कि.5000 रुचा  कोणीतरी अज्ञात व्यक्तीने  चोरुन नेला. अशा मजकुराच्या दत्तात्रय थोरात यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

परंडा  : टाकळी ता परंडा येथील राहणारे शहाजी मारुती पवार वय 52 वर्ष हे दिनांक 09.01.2022 रोजी 10.00 वा त्यांचे राहते घरासमोर बसलेले असतांना गावकरी शिवाजी पवार हे फिया्रदीस म्हणाले की, तु तुझे पुतण्या सुरज पवार याचे बाजुने का बोलतोस असे म्हणुन हातातील लोखंडी गज  शहाजीचे उजव्या हाताचे कोप-यावर मारुन जखमी केले.तर शिवाजी पवार यांचे सह शहाबाई पवार यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली..अशा मजकुराच्या शहाजी पवार यांनी दिलेल्या दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324,323,504,506 कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुरुम : युनुस मनसुर जमादार,रा.आलुर ता.उमरगा  दि. 08.01.2022 रोजी 15.00 वा. सु. म. छ शिवाजी महाराज चौक, मुरुम येथील सार्वजनिक रस्त्यावर कमांडर जीप  वाहन क्र. एम.एच. 24 ए 7220 हा  रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन नमूद व्य्क्तीवीरुध्द मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.