अवैधरित्या देशी कट्टा (अग्नी शस्त्र) बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

तुळजापूर : उस्मानाबाद – लातूर रस्त्यावरील पाचुंदा तलावाजवळ दोन पुरुष गावठी बनावटीचे पिस्टल हे अग्नी शस्त्र बाळगून असल्याची गोपनीय खबर तुळजापूर पो.ठा. च्या पथकास दि. 30.12.2021 रोजी 16.45 वा. सु.मिळाली. यावर पथकाने लागलीच पाचुंदा तलाव परिसर गाठले असता त्या ठिकाणी खंडाळा, ता. तुळजापूर येथील राजेंद्र सुरेश कांबळे यांसह एक अल्पवयीन मुलगा (विधी संघर्षग्रस्त बालक) हे दोघे नमूद वर्णनाचे पिस्टल आपल्या ताब्यात बाळगले असल्याचे आढळले. यावर पथकाने ते पिस्टल ताब्यात घेउन त्यांच्याविरध्द तुळजापूर पो.ठा. येथे शस्त्र कायदा कलम- 36, 25 सह 188, 34 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 37, 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे तीन गुन्हे दाखल 

येरमाळा  : येरमाळा -  बार्शी महामार्गाच्या बांधकामावर ट्रक चालक- रमेश कोल, रा. मध्यप्रदेश हे दि. 29.12.2021 रोजी 11.30 वा. सु. ट्रकमधील मुरुम ओतत होते. यावेळी ग्रामस्थ- दत्तात्रय बारकुल यांनी मुरुम ओतण्यास मनाई करुन कोल यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन कंबर पट्ट्याने मारहान केली. अशा मजकुराच्या कोल यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 341, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम : भुम येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोरील रस्त्यावर भुम ग्रामस्थ- वैभव गाढवे यांना दि. 27.12.2021 रोजी 20.00 वा. गावकरी- अझहर, हैदर, अख्तर, अफ्ताब, अखिलेश जमादार यांसह सुलेमान पठाण, समीर सय्यद यांनी जुन्या वादातून लाथाबुक्क्यांनी व अवजड वस्तूने डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या वैभव गाढवे यांनी दि. 30 डिसेंबर रेाजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील ओंकार काकडे यास गावकरी- प्रतापसिंह शेंडगे, सागर देशमुख, संकेत बागल, शंभु निंबाळकर, सुजित मुंढे, शशिकांत लोकरे यांनी 29.12.2021 रोजी 17.00 वा. कुरनेनगर, उस्मानाबाद येथे जुन्या वादातून शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, दगड, कोयता, गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या ओंकार यांनी दि. 30 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.