सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्या 83 व्यक्तींविरुध्द गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद -  सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या, वाहतुक करणाऱ्या, निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या, कोविड- 19 मनाई आदेशांचे उल्लंघन इत्यादी प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 09.12.2021 रोजी 83 कारवाया करुन संबंधीत पोलीस ठाण्यात 83 व्यक्तींविरुध्द खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

यात सार्वजनिक ठिकाणी हातगाडे, हॉटेलमध्ये धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द तुळजापूर पो.ठा.- 4, उस्मानाबाद (ग्रा.)- 8, वाशी- 3, भुम- 3, नळदुर्ग- 4, अंबी- 3, शिराढोन- 2, कळंब- 4, येरमाळा- 1, परंडा- 1, उमरगा- 4 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तर

 सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्यांविध्द अंबी पो.ठा.- 1, ढोकी- 2, नळदुर्ग- 6, येरमाळा- 3, लोहारा- 2 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तसेच सार्वजनिक रस्त्यावर जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपने, भरधाववेगात वाहन चालवणाऱ्या चालकांविरुध्द भुम पो.ठा.- 9, येरमाळा- 2, तामलवाडी- 2, कळंब- 2, शिराढोन- 3, उस्मानाबाद (ग्रा.)- 2, ढोकी- 3 चालकांविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. कोविड-19 संदर्भाने जारी असलेल्या प्रशासनाच्या मनाई आदेशाचे भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द वाशी पो.ठा.- 1, परंडा- 2, शिराढोन-4 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत.