सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या 32 व्यक्तींविरुध्द गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद : सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या, वाहतुक करणाऱ्या तसेच निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या, कोविड- 19 मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 22.01.2022 रोजी कारवाया करुन संबंधीत पोलीस ठाण्यात 32 व्यक्तींविरुध्द खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

यात सार्वजनिक ठिकाणी हातगाडे, हॉटेलमध्ये धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद (श.) पो.ठा.- 1, परंडा- 1, अंबी- 2, भुम- 2, ढोकी- 1, कळंब- 2, नळदुर्ग- 1, आनंदनगर-1, येरमाळा- 2 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्यांविध्द उमरगा पो.ठा.- 4, मुरुम- 4 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तर सार्वजनिक रस्त्यावर जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपने, भरधाववेगात वाहन चालवणाऱ्या चालकांविरुध्द उस्मानाबाद (श.) पो.ठा.- 1, येरमाळा- 1, भुम- 1, तामलवाडी- 3 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तसेच कोविड-19 संदर्भाने जारी असलेल्या प्रशासनाच्या मनाई आदेशाचे भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद (श.) पो.ठा.- 1 व शिराढोन पो.ठा. यांनी 4 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत.


मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

कळंब  : डिकसळ, ता. कळंब येथील विजय बाबु पवार व रुपाली पवार या दोघांनी जुन्या वादावरून दि. 22.01.2022 रोजी 12.00 वा. सु. ग्रामस्थ- युवराज बाबुराव पवार यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहान करुन जखमी केले. यावेळी युवराज यांच्या बचावास सरसावलेल्या त्यांच्या पत्नी- आशाबाई यांसही नमूद दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या युवराज पवार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : शेतातील ऊस पिक तोडणीच्या कारणावरुन तुगाव, ता. उस्मानाबाद येथील बळीराम शिनगारे, सिध्देश्वर शिनगारे, सतिश शिनगारे, ओमराजे शिनगारे, अभिषेक शिनगारे, गणेश शिनगारे, आकाश भुतेकर या सर्वांनी दि. 22.01.2022 रोजी 11.30 वा. सु. भंडारवाडी ग्रामस्थ- रामराजे श्रीपती पवार यांसह त्यांचा भाऊ- शिवानंद, भावजय- मैनाबाई यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळी, काठी, ऊसाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रामराजे पवार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.