कोळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी निवडणुकीत हाणामारी
ढोकी :कोळेवाडी, ता, उस्मानाबाद येथील- सुरज आकोसर, समाधान आकोसकर, ज्ञानोबा तात्या आदटराव, सुजितकुमार राउत,भारत आकोसकर,रामकिसन आकोसकर, अन्य 15 यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या कोळेवाडी मंडळ पंचवार्षीक निवडणूक 2023-2028 चि निवडणुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेवाडी येथे चालू असताना दि.12.02.2023 रोजी 11.30 वा. सु. कोळेवाडी ते डकवाडी जाणारे रोडचे बाजूला लिंबाच्या झाडाखाली नमूद इसमांनी एकत्रीत येउन एकमेकांना शिवीगाळ करुन मारहान केली.
इतरांचे जिवीतास व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल दंगल करुन एकमेकांना मारहान करुन दुखापत केली. सार्वजनिक शांतता भंग केली. यावरुन ढोकी पो.ठा. चे पोलीस अंमलदार महेश व्यंकटराव शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 160, 336, 337 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल
कळंब : नवनाथ दत्तोबा खांडेकर, पोलीस अंमलदार/1782 नेमणुक उपविभागीय पोलीस कार्यालय कळंब हे व सोबत इतर अंमलदार दि. 12.02.2023 रोजी 19.45 वा. सु. कळंब शहरात वाहतुकीचे नियमन करीत असताना भिमनगर, कळंब येथील- सम्राट ऊर्फ संभाजी मच्छींद्र गायकवाड व अन्य 2 यांनी संगणमताने रोडवर लावलेल्या गाड्या काढून घ्या रहदारीस अडथळा होत आहे. असे म्हणताच संभाजी यांने नवनाथ यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून लाथाबुक्यांनी गळ्यावर छातीवर नखाने मारहान करून दुखापत केली. तसेच शासकिय कामात अडथळा निर्माण केला. जिवे मारण्याची धमकी दिली. यावरुन पोलीस अंमलदार नवनाथ खांडेकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.