भूम तालुक्यात दोन ठिकाणी हाणामारी 

 

  भुम  : आरोपी नामे-1) बालाजी श्रीधर मासाळ, 2) श्रीधर मासाळ, 3) सताबाई श्रीधर मासाळ तिघे रा. वाकवड, ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी कौटुंबिक वादाचे कारणावरून दि.10.07.2023 रोजी सायंकाळी 05.00 वा. सु. वाकवड येथे फिर्यादी नामे- कामीनी बालाजी मासाळ वय 28, रा. वाकवड, ता. भुम जि. उस्मानाबाद यांना बालाजी मासाळ यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केली. तर आरोपी नामे श्रीधर मासाळ यांनी कामीनी मासाळ यांचे हातावर दगडाने मारहान करुन गंभीर जखमी केले. तसेच पेरणाबाई हाके या कामीणी यांचे बचावास आले असता त्यासही यातील आरोपीनी संगणमताने मारहान केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कामीनी मासाळ यांनी दि.18.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भुम  :आरोपी नामे -विकास मोरे, रा. बाजार रोड भुम ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी घरकुल मंजूर का करत नाही या कारणावरुन दि. 10.07.2023 रोजी सायंकाळी 08.30 वा. सु. साठेनगर चौक ता. भुम येथे फिर्यादी नामे- रोहीतकुमार संजय ईटकर, वय 26 वर्षे, रा. वडारगल्ली भुम ता. भुम जि. उस्मानाबाद हे त्यांचे मित्रा विशाल शिंदे यांचे सोबत थांबले असता आरोपी विकास मोरे यांनी रोहीतकुमार ईटकर यांना शिवीगाळ करुन फरशीने डोक्यात व खांद्यावर मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या रोहीतकुमार ईटकर यांनी दि.18.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  :आरोपी नामे- सुरेश भुजंग सुर्यवंशी, वय 28 वर्षे रा. कोरेगाव, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी काही एक कारण नसताना दि. 18.07.2023 रोजी सांयकाळी 19.30 वा. सु कोरेगाव येथे फिर्यादी नामे कुमार हुसेन कांबळे, वय 45 वर्षे रा. कोरेगाव, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांचे मुलास विनाकारण शिवीगाळ केल्याने फिर्यादी व त्यांचा मुलगा शरद कुमार हे आरोपी नामे सुरेश सुर्यवंशी यांना विचारण्यास गेले असता सुरेश सुर्यवंशी यांनी  फिर्यादीस शिवीगाळ करुन विठाने मारुन जखमी केले. फिर्यादीचा मुलागा शरद यास लाथाबुक्यानी मारहान करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कुमार कांबळे यांनी दि.18.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.